‘विश्वजेतेपदासाठी घाई करणार नाही’ - विजेंदर सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:19 IST2017-12-14T02:19:14+5:302017-12-14T02:19:25+5:30

Will not hurry for World Cup title - Vijender Singh | ‘विश्वजेतेपदासाठी घाई करणार नाही’ - विजेंदर सिंग

‘विश्वजेतेपदासाठी घाई करणार नाही’ - विजेंदर सिंग

जयपूर : ‘आतापर्यंत जिंकलेल्या दोन विजेतेपदांचे समाधान असून पुढील वर्षी जागतिक जेतेपद पटकावण्याच्या शर्यतीत मी कोणतीही घाई करणार नाही,’ असे भारताचा व्यावसायिक स्टार बॉक्सर विजेंदर सिंग याने म्हटले. आतापर्यंत सलग ९ व्यावसायिक लढती जिंकताना विजेंदरने डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक तसेच ओरिएंटल सुपर मिडलवेट जेतपद पटकावले.
आता २३ डिसेंबरला विजेंदर जयपूर येथे घानाच्या अर्नेस्ट एमुजूच्या आव्हानाला सामोरा जाणार आहे. एमुजूने २५ लढती खेळताना २१ लढती जिंकल्या आहेत. विजेंदरने म्हटले की, ‘एमुजू चांगला बॉक्सर आहे. आशियामध्ये त्याची ही पहिलीच लढत असेल आणि यामध्ये विजय मिळवण्यास तो उत्सुक आहे. मी नक्कीच त्याला नमवेल कारण सिंग इज किंग.’ त्याचप्रमाणे, ‘विजयी आगेकूच करण्यास मी कोणतीही घाई न करता हळू हळू आगेकूच करणार,’ असेही विजेंदर म्हणाला. (वृत्तसंस्था)

Web Title: Will not hurry for World Cup title - Vijender Singh

टॅग्स :Sportsक्रीडा