'हा' प्रसिद्ध क्रिकेटपटू करणार होता आत्महत्या
By Admin | Updated: November 2, 2016 15:25 IST2016-11-02T14:51:20+5:302016-11-02T15:25:26+5:30
तो आत्महत्या करण्याच्या विचारामध्ये होता. 'द रॉंग अन' या आत्मचरित्रात त्याने हा खुलासा केला आहे.

'हा' प्रसिद्ध क्रिकेटपटू करणार होता आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. २ - ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉगने त्याच्या आत्मचरित्रात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर लग्नातील अपयशामुळे ब्रॅड हॉग आत्महत्या करण्याच्या विचारामध्ये होता. 'द रॉंग अन' या आत्मचरित्रात त्याने हा खुलासा केला आहे.
निराशाजनक मनस्थितीत असताना हॉगने अति मद्यपान सुरु केले होते. एकदा पोर्ट बीच इथे गाडी पार्क करुन मी समुद्राच्या दिशेने चालत गेलो. त्यावेळी आत्महत्येचे विचार माझ्या मनात होते असे हॉगने लिहीले आहे. 'द रॉंग अन' पुस्तकात द कोलॅप्स नावाचे एक प्रकरण आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्तीमागे वैवाहीक आयुष्यातील समस्या खरे कारण असल्याचे हॉगने नमूद केले आहे.
शेन वॉर्नच्या निवृत्तीनंतर ब्रॅड हॉगने संघातील आपले स्थान पक्के केले होते.जानेवारी २००८ मध्ये अॅडलेड ओव्हलमध्ये भारता विरुद्ध करीयरमधील शेवटची कसोटी खेळताना मी भरपूर रडलो होतो असे हॉगने लिहीले आहे. ब्रॅड हॉगने सात कसोटी सामन्यात फक्त १७ विकेट आणि १२४ एकदिवसीय सामन्यात १५७ विकेटस घेतल्या.