पत्नीच्या 'त्या' फोटोवरुन शामीचे टीकाकारांना चोख उत्तर

By Admin | Updated: December 26, 2016 14:22 IST2016-12-26T12:49:46+5:302016-12-26T14:22:45+5:30

कट्टरपंथीय मानसिकतेच्या लोकांकडून अत्यंत खालच्या पातळीची टीका सहन करत असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे.

Wife's 'That' photo gives a good answer to the incompetent commentators | पत्नीच्या 'त्या' फोटोवरुन शामीचे टीकाकारांना चोख उत्तर

पत्नीच्या 'त्या' फोटोवरुन शामीचे टीकाकारांना चोख उत्तर

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 26 - पत्नीच्या पोशाखावरुन कट्टरपंथीय मानसिकतेच्या लोकांकडून अत्यंत खालच्या पातळीची टीका सहन करत असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. 23 डिसेंबरला शामीने त्याच्या फेसबुकवर अकाऊंटवर पत्नी आणि मुलीसोबतच एक फोटो पोस्ट केला. यात पत्नीच्या पोशाखावरुन शामीला कट्टरपंथीयांनी लक्ष्य केले आहे. 
 
अत्यंत आक्षेपार्ह टीकाटिप्पणी सुरु आहे. तु मुस्लिम आहेस, पत्नीला झाकून ठेव, हाशिम आमला, मोईन अलीकडून काहीतरी शिक असा सल्ला काहींनी त्याला दिला. माझी पत्नी आणि मुलगी माझे आयुष्य आहेत. काय करावे किंवा काय करु नये हे मला चांगले ठाऊक आहे. आपल्याला स्वत:मध्ये डोकावून आपण किती चांगले आहोत हे पाहिले पाहिजे असे टि्वट शामीने केले आहे. 
 
शामीच्या त्या फोटोवर 1500 पेक्षा जास्त कमेंट आल्या. सोशल मीडियावर जसे विरोधक उभे राहिले तसेच समर्थकही समोर आले. क्रिकेटपटू मोहम्मद कैफनेही शामीचे समर्थन केले.