जख्मी मेस्सीला व्हेनेझुएलाविरुद्ध सामन्यात विश्रांती

By Admin | Updated: September 4, 2016 01:50 IST2016-09-04T01:50:43+5:302016-09-04T01:50:43+5:30

निवृत्ती जाहीर केल्यानंतर पुनरागमन केलेल्या लिओनेल मेस्सीने उरुग्वेविरोधात संघाला १ -० ने विजय मिळवून दिला. मात्र, मेस्सी आता दुखापतीमुळे व्हेनेझुएलाविरुद्धच्या सामन्यात

Wickets Messi Rest in the match against Venezuela | जख्मी मेस्सीला व्हेनेझुएलाविरुद्ध सामन्यात विश्रांती

जख्मी मेस्सीला व्हेनेझुएलाविरुद्ध सामन्यात विश्रांती

मेंडोजा : निवृत्ती जाहीर केल्यानंतर पुनरागमन केलेल्या लिओनेल मेस्सीने उरुग्वेविरोधात संघाला १ -० ने विजय मिळवून दिला. मात्र, मेस्सी आता दुखापतीमुळे व्हेनेझुएलाविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही.
गेल्या महिन्यात कोपा अमेरिका स्पर्धेतील पराभवानंतर मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, पुनरागमन करीत उरुग्वेविरोधात त्याने दमदार खेळ केला. या विजयामुळे अर्जेंटिना दक्षिण अमेरिकी संघांच्या ग्रुपमध्ये अग्रस्थानी पोहोचला आहे. मेस्सीला दुखापतीमुळे व्हेनेझुएलाविरुद्धचा सामना खेळता येणार नाही. संघ व्यवस्थापनाने मेस्सी खेळणार नसल्याचे स्पष्ट केले.

दुखापतीने मी त्रस्त आहे. नेहमीच संघासोबत राहू इच्छितो; मात्र आणखी महत्त्वाचे सामने खेळायचे आहेत. संघाच्या पराभवाने मी व्यथित झालो होतो. त्यामुळे निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मला खेळ आणि चाहत्यांची उणीव भासत होती; त्यामुळे पुन्हा परतण्याचा निर्णय घेतला.
- मेस्सी म्हणाला

Web Title: Wickets Messi Rest in the match against Venezuela