India vs USA Checkmate Event : अमेरिकेच्या आर्लिंग्टन (टेक्सास) येथे पार पडलेल्या India vs USA Checkmate Event बुद्धिबळ स्पर्धेत यजमान अमेरिकन संघाने भारताला ५-० अशी मात दिली. ही स्पर्धा चांगलीच रंगतदार झाली. दोन्ही देशांतील स्पर्धांकमध्ये कडवी टक्कर पाहायला मिळाली. पण मोक्याच्या क्षणी अमेरिकन बुद्धिबळपटूंनी डाव साधला अन् भारतीय संघ मागे पडला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दिव्या देशमुखचा पराभवाचा धक्का
या स्पर्धेत अमेरिकेचा ग्रँडमास्टर हिकारू नाकामुरा याने वर्ल्ड चँपियन डी. गुकेशला पराभूत केले. दुसऱ्या बाजूला फाबियानो करुआना याने अर्जुन एरिगेसीला पराभूत करून संघाला पुढे नेले. इंटरनॅशनल मास्टर कारिसा यिप हिने ग्रँडमास्टर दिव्या देशमुखला पराभूत करत मोठा उलटफेर दाखवणाऱ्या निकालाची नोंद केली. लेवी रोजमन आणि सागर शाहल यांच्यात झालेल्या सामन्यात रोजमन भारी ठरला. टेनी एडेवुमीने ईथन वैजला पराभूत करताच अमेरिका संघाने या स्पर्धेत ५-० असे निर्वावाद यश मिळवले.
..अन् अमेरिकेच्या प्रतिस्पर्ध्यानं भारताच्या डी. गुकेशचा पटलावरचा 'राजा' उचलून प्रेक्षकांत फेकला
या स्पर्धेत एक विचित्र आणि वादग्रस्त घटना घडली. स्पर्धेत कोण जिंकलं यापेक्षा अमेरिकेच्या नाकामुरा याने डी. गुकेशला पराभूत केल्यावर जे केलं ती गोष्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अमेरिकन ग्रँडमास्टरनं भारताच्या जगजेत्त्या डी. गुकेशला नमवल्यावर आनंद व्यक्त करताना बुद्धिबळ पटलावरील गुकेशचा 'किंग उचलून प्रेक्षकांमध्ये फेकला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. बुद्धिबळसारख्या स्पर्धेत असे कृत्य करणं अशोभनिय आहे, अशा प्रतिक्रिया उमटल्या. रशियन ग्रँडमास्टर व्ह्लादिमीर क्रॅमनिक याने या घटनेवर तिखट प्रतिक्रिया दिलीये. अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा याने मॉडर्न बुद्धिबळची प्रतिष्ठा धुळीस मिळवलीये, असा आरोप रशिनय बुद्धिबळपटूनं केला. भारतीय बुद्धिबळपटूचा अपमान झाल्याचीही चर्चा रंगताना दिसत आहे. यावर आता आयोजकांनी स्पष्टीकरण दिले आहे.
सगळं ठरवून केलं, पण का?
अमेरिकन बुद्धिबळपटूने केलेली कृती असभ्य वाटू शकते. पण जे घडलं ते सगळं ठरलेल्या स्क्रिप्टचा भाग होता, असे स्पष्टीकरण बुद्धिबळ विश्लेषक स्पेशलिस्ट लेवी रोजमन याने आपल्या यूट्यूब व्हिडिओतून दिले आहे. पाहणाऱ्या प्रेक्षकांना संदर्भाशिवाय हे कृत्य असभ्य वाटू शकते, पण प्रत्यक्षात आयोजकांनी विजेत्याला 'किंग' फेकण्याचे आदेश दिले होते. नाकामुराने नंतर गुकेशशी संवाद साधला आणि स्पष्ट केले की, हा फक्त शोचा भाग होता. बुद्धिबळाच्या खेळातील नव नाट्य वेगळा अनुभव देणारे होते. हा कारकिर्दीतील सर्वोत्तम लाइव्ह अनुभवांपैकी एक होता, असे मत डी. गुकेशला शह देणाऱ्या अमेरिकन बुद्धिबळपटूने म्हटलं आहे.
Web Summary : In a Checkmate Event, the USA beat India 5-0. Nakamura threw Gukesh's king piece into the crowd, sparking controversy. It was pre-planned as part of the show, says organizer Levi Rozman. Gukesh confirmed it was just for entertainment.
Web Summary : चेकमेट इवेंट में, यूएसए ने भारत को 5-0 से हराया। नाकामुरा ने गुकेश के राजा को दर्शकों में फेंका, जिससे विवाद हुआ। आयोजक लेवी रोजमैन के अनुसार, यह शो का हिस्सा था। गुकेश ने पुष्टि की कि यह मनोरंजन के लिए था।