चषक कोणाकडे?
By Admin | Updated: June 7, 2015 00:52 IST2015-06-07T00:52:54+5:302015-06-07T00:52:54+5:30
रोमहर्षक सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोवीचने ब्रिटनच्या अॅँडी मरेचा पराभव केला. याबरोबरच त्याने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक दिली.

चषक कोणाकडे?
पॅरिस : रोमहर्षक सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोवीचने ब्रिटनच्या अॅँडी मरेचा पराभव केला. याबरोबरच त्याने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक दिली. आता त्याची लढत स्टॅनिसलास वॉवरिन्काविरुद्ध होईल. त्यामुळे यंदाचा चषक कुणाकडे याची उत्सुकता वाढली आहे. जोकोवीचकडे करिअरमधील तिसरा ग्रॅण्डस्लॅम पूर्ण करण्याची संधी आहे.
नऊ वेळा चॅम्पियन ठरलेल्या स्पेनच्या राफेल नदालचा जोकोविचने उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला होता. त्यानंतर अॅँडी मरे याच्यावर त्याने पाच सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात बाजी मारली. हा सामना त्याने ६-३, ६-३,५-७, ५-७ आणि ६-१ ने जिंकला. शुक्रवारी झालेल्या या सामन्यात वादळामुळे ‘ब्रेक’ देण्यात आला होता. त्या वेळी चौथ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडू ३-३ अशा बरोबरीवर होते. मरे याने पहिले दोन सेट गमावल्यानंतर पुढील दोन सेट जिंकत सामना २-२ अशा बरोबरीवर आणला. मात्र, निर्णायक सेटमधे सर्बियाच्या जोकोविचने सहज मात करीत आठवा विजय नोंदवला. विशेष म्हणजे, जानेवारीमध्ये झालेल्या आॅस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्येही जोकोविचने अॅँडी मरेचा पराभव केला होता.