द. अमेरिकेचा फुटबॉल सम्राट कोण?
By Admin | Updated: June 12, 2015 03:43 IST2015-06-12T03:43:13+5:302015-06-12T03:43:13+5:30
दक्षिण अमेरिका खंडाचा फुटबॉल सम्राट कोण? या प्रश्नाचे उत्तर देणारी स्पर्धा म्हणजे ‘कोपा अमेरिका’ स्पर्धा ११ जूनपासून सुरू होत आहे.

द. अमेरिकेचा फुटबॉल सम्राट कोण?
विश्वास चरणकर, कोल्हापूर
दक्षिण अमेरिका खंडाचा फुटबॉल सम्राट कोण? या प्रश्नाचे उत्तर देणारी स्पर्धा म्हणजे ‘कोपा अमेरिका’ स्पर्धा ११ जूनपासून सुरू होत आहे. सर्वांत जुन्या स्पर्धेपैकी एक असलेल्या या स्पर्धेतून दक्षिण अमेरिकेच्या १० सदस्य देशातून ४ संघ फिफा वर्ल्डकपसाठी पात्र ठरतात; त्यामुळे या स्पर्धेला महत्त्व आहे. यंदा ही स्पर्धा आयोजन करण्याचा मान चिली या देशाला योगायोगाने मिळाला आहे. या स्पर्धेत दक्षिण अमेरिका फुटबॉल संघटनेचे (कॉन्मेबॉल) १० सदस्य देश आणि २ बाहेरील निमंत्रित संघ असे १२ संघ सहभागी होतात. १९१६ साली सुरूझालेल्या या स्पर्धेचा विद्यमान विजेता उरुग्वे असून यंदाच्या विजेतेपदासाठी अर्जेंटिनाला प्रबळ दावेदार मानले जात आहे.
जगातील एक प्रतिष्ठेची आणि प्रचंड व्हिव्हरशीप असलेली कोपा अमेरिका स्पर्धेतून फिफा कॉन्फेडरेशन चषकासाठी टॉप ६ संघांना प्रवेश मिळवून देते. ही स्पर्धा १९१६ साली पहिल्यांदा भरविण्यात आली. तेव्हापासून ४४ वेळा ही स्पर्धा झाली असून यंदा स्पर्धेचे ४५ वे वर्ष आहे. उरुग्वे हा या स्पर्धेचा सर्वाधिक वेळेचा विजेता असून त्यांनी १५ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.