व्हाइटचे सहज विजेतेपद
By Admin | Updated: March 15, 2015 01:39 IST2015-03-15T01:39:43+5:302015-03-15T01:39:43+5:30
इंग्लंडच्या कसलेल्या व अनुभवी रिकी वॉल्डेनचा ५-० असा फडशा पाडत दुसऱ्या इंडियन ओपन स्नूकर जागतिक मानांकन स्पर्धेचे शानदार विजेतेपद पटकावले.

व्हाइटचे सहज विजेतेपद
मुंबई : वेल्सचा युवा खेळाडू मायकल व्हाईने जबरदस्त बाजी मारत जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडच्या कसलेल्या व अनुभवी रिकी वॉल्डेनचा ५-० असा फडशा पाडत दुसऱ्या इंडियन ओपन स्नूकर जागतिक मानांकन स्पर्धेचे शानदार विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे व्हाईटचे हे पहिले वहिले मानांकन विजेतेपद ठरले.
बिलियडर््स अॅण्ड स्नूकर फेडरेशन आॅफ इंडियाच्या (बीएसएफआय) वतीने मुंबईत पार पडलेल्या या स्पर्धेत २३ वर्षीय युवा खेळाडू व्हाईटने अंतिम सामना पुर्णपणे एकतर्फी करताना सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का दिला. उपांत्य फेरीमध्ये वॉल्डेनने दिमाखदार विजय मिळवताना स्पर्धेत जायंट किलर ठरलेल्या थायलंडच्या थेपचैया उन-नूह याचा ४-३ असा पाडाव केला होता. त्यामुळे वॉल्डेनकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात होते.
मात्र जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या व्हाईटने सर्वांचे अम्दाज चुकीचे ठरवताना वॉल्डेनला ‘व्हाईट वॉश’ दिला. पहिल्याच फ्रेममध्ये एकतर्फी बाजी मारताना व्हाईटने सनसनाटी सुरुवाती केली. येथेच यावेळी काहीतरी अनपेक्षित घडणार असल्याचे संकेत मिळाले. यानंतर वॉल्डेनने थोडा प्रतिकार करताना पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र २० गुण मिळल्यानंतर त्याला संधी मिळाली नाही आणि दुसरा फ्रेमही जिंकताना व्हाईटने २-० अशी आघाडी घेतली.
तिसऱ्या फ्रेममध्ये पुन्हा एकदा व्हाईटने एकतर्फी खेळ करताना ३-० अशी एकतर्फी आघाडी घेतली. येथे काहीसा दडपणाखाली आलेल्या वॉल्डेनकडून चुका होऊ लागल्या व त्याचा अचूक फायदा उचलताना सलग दोन फ्रेम जिंकत अखेर व्हाईटने ८१-०, ७७-२०, ८६-०, ९०-१, ८५-६ अशा विजयासह विजेतेपदावर कब्जा केला. (क्रीडा प्रतिनिधी)