जे योग्य त्याच्याच बाजूने : धोनी
By Admin | Updated: August 7, 2014 00:17 IST2014-08-07T00:17:13+5:302014-08-07T00:17:13+5:30
रवींद्र जडेजा व जेम्स अँडरसन यांच्या प्रकरणादरम्यान मी जे काही बोललो किंवा सांगितले, त्यावर मी अजूनही ठाम आहे.

जे योग्य त्याच्याच बाजूने : धोनी
>अजय नायडू - मँचेस्टर
रवींद्र जडेजा व जेम्स अँडरसन यांच्या प्रकरणादरम्यान मी जे काही बोललो किंवा सांगितले, त्यावर मी अजूनही ठाम आहे. त्यांनी जे मुद्दे अमान्य होते ते समोर ठेवले असल्याचे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने सांगितले.
पहिल्या कसोटी सामन्यात जे वादंग निर्माण झाले, त्या घटनेवरून ही कसोटी मालिका लक्षात राहण्यासारखी होईल, असे वाटते. आयसीसी न्यायालय आयुक्तांनी गेल्या शुक्रवारी जडेजा व अँडरसन यांना निदरेष सोडले, तर जगातील क्रिकेटच्या सर्वोच्च संस्थेने बीसीसीआयच्या आग्रहाविरुद्ध या निर्णयावर अपील न करण्याचा निर्णय घेतला.
आपला सहकारी जडेजाचे समर्थन करताना धोनी म्हणाला, ‘‘जे सत्य आहे, त्याच्या बरोबर मी आहे. खरे काय आणि खोटे काय? मी सत्याची बाजू घेतली आहे. जर काही चुकीचे होत असेल, तर मी त्याची पर्वा केली नसती. त्याच्याविरुद्ध मी गेलो असतो. जर माङया सहका:याला मर्यादेत व नियमात राहूनसुद्धा दंड होत असेल, तर निश्चितपणो मला सहन होणार नाही. त्याची बाजू मी नक्कीच घेणार आणि जर माझा सहकारी नियमांचे उल्लंघन करीत असेल, तर मी त्याच्याबरोबर राहणार नाही. त्याला एकटय़ालाच त्याची शिक्षा भोगू देईन.’’ आयसीसीच्या निर्णयाविरुद्ध धोनी म्हणाला, ‘‘तो शारीरिक स्पर्श होता, ज्याची आम्ही तक्रार केली होती. इतर कोणत्याही बाबतीत सांगितले नाही.’’ अनेक वेळा अपशब्दांचा उपयोग केला जातो; परंतु त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो, असे शेवटी धोनीने सांगितले.
‘‘जे सत्य आहे, त्याच्या बरोबर मी आहे. खरे काय आणि खोटे काय? मी सत्याची बाजू घेतली आहे. जर काही चुकीचे होत असेल, तर मी त्याची अजिबात पर्वा करणार नाही. मग तो कितीही मोठा का असेना, जर माङया सहका:याला मर्यादेत व नियमात राहूनसुद्धा दंड होत असेल, तर निश्चितपणो मला सहन होणार नाही.- महेंद्रसिंह धोनी
आमचे खेळाडू मर्यादेतच : कुक
मँचेस्टर : मैदानावर जेम्स अॅंडरसनच्या आक्रमकतेबद्दल इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुकला कोणतीही अडचण नाही. त्याने अॅंडरसनला पुन्हा पूर्ण पाठिंबा दिला. नॉटिंगहम कसोटीदरम्यान रवींद्र जडेजाला धक्का दिल्याप्रकरणी अॅंडरसनच्या विरोधात कोणताही पुरावा मिळाला नाही. त्यामुळे तो भाग्यवान ठरला.असे असतानाही कर्णधार कुकने आपले खेळाडू मर्यादेत राहत असल्याचे सांगितले.
जिमीकडून काही वेळा मर्यादा भंग झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याला प्रोत्साहित करण्यापेक्षा त्याच्या नैसर्गिक खेळाला उत्तेजन देणो अधिक श्रेयस्कर ठरेल.- अॅलिस्टर कुक