....जेंव्हा सर विवियन रिचर्ड्स भारतीय संघाला भेटतात

By Admin | Updated: July 19, 2016 17:48 IST2016-07-19T17:48:58+5:302016-07-19T17:48:58+5:30

भारतीय संघ सध्या वेस्टइंडिज विरुद्ध २१ जुलै पासून सुरु होणाऱ्या ४ कसोटी सामन्याच्या तयारीला अंतिम स्वरुप देत आहेत. भारतीय संघ हॉटेलमध्ये असताना तिथे चक्क वेस्ट इंडियन धडाकेबाज फलंदाज

.... Whenever Sir Viv Richards meets the Indian team | ....जेंव्हा सर विवियन रिचर्ड्स भारतीय संघाला भेटतात

....जेंव्हा सर विवियन रिचर्ड्स भारतीय संघाला भेटतात

ऑनलाइन लोकमत
एंटीगा, दि. १९ : भारतीय संघ सध्या वेस्टइंडिज विरुद्ध २१ जुलै पासून सुरु होणाऱ्या ४ कसोटी सामन्याच्या तयारीला अंतिम स्वरुप देत आहेत. भारतीय संघ हॉटेलमध्ये असताना तिथे चक्क वेस्ट इंडियन धडाकेबाज फलंदाज सर विवियन रिचर्ड्स दाखल झाले. भारतीय संघासोबत त्यानी आपला मौल्यवान वेळ आणि अनुभव विराट कोहली आणि संघाबरोबर शेअर केले. यावेळी फलंदाजांना त्यांनी फलंदाजीच्या काही टीप्सही सांगितल्या.

कर्णधार विराट कोहली आणि इतर खेळाडूसांठी तो एक महत्वाचा क्षण होता. संघातील सर्व खेळाडूंनी त्यांना झालेला आनंद सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त केला. कोहली, धवन आणि के राहूल यांनी विवियन रिचर्ड्स सोबतचे फोटो ट्विटर वर पोस्ट केले आहेत

अँटिग्वा येथील सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध २१ - २५ जुलै दरम्यान पहिला कसोटी सामना होणार आहे.

 

 

Web Title: .... Whenever Sir Viv Richards meets the Indian team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.