सानिया मिर्झाला मातृत्वाबाबत विचारणा केल्यावर ती भडकली

By Admin | Updated: July 14, 2016 18:37 IST2016-07-14T18:37:59+5:302016-07-14T18:37:59+5:30

सानिया मिर्झाला एका मुलाखतीदरम्यान मातृत्वाबाबत प्रश्न विचारल्यावर तिला राग अनावर झाला.

When Sania Mirza asked for her mother's death, she got excited | सानिया मिर्झाला मातृत्वाबाबत विचारणा केल्यावर ती भडकली

सानिया मिर्झाला मातृत्वाबाबत विचारणा केल्यावर ती भडकली

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - टेनिसमध्ये मिश्र दुहेरी खेळात जगातलं अव्वल स्थान पटकावणारी खेळाडू सानिया मिर्झाला एका मुलाखतीदरम्यान मातृत्वाबाबत प्रश्न विचारल्यावर तिला राग अनावर झाला. इंडिया टुडे या वृत्तवाहिनीवर मुलाखत सुरू असताना तिनं मुलाखत घेणारे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना खडे बोल सुनावले आहेत. राजदीप सरदेसाईंनी मुलाखतीदरम्यान जेव्हा तिला मातृत्वाबाबत प्रश्न विचारला तेव्हा तिनं त्यांना याचं उत्तर मला बॅटनं द्यावं लागेल, असं म्हटलं आहे. अखेर नमतं घेत राजदीप सरदेसाईंनी तिची माफी मागितली आहे. 

Web Title: When Sania Mirza asked for her mother's death, she got excited