जेव्हा मोदींनी केली अंकिताची मदत
By Admin | Updated: June 10, 2014 08:43 IST2014-06-10T01:21:00+5:302014-06-10T08:43:15+5:30
खेळाडूंना सैनिकांप्रमाणो दर्जा देण्याचे आश्वासन देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी खेळाडूंना मदतीचा हात दिल्याचे दिसून येते.

जेव्हा मोदींनी केली अंकिताची मदत
>नवी दिल्ली : खेळाडूंना सैनिकांप्रमाणो दर्जा देण्याचे आश्वासन देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी खेळाडूंना मदतीचा हात दिल्याचे दिसून येते. केवळ एका मुलाखतीनंतर भारताची अव्वल टेनिस स्टार अंकिता रैनाची प्रवासाबाबतची अडचण त्यांनी त्या वेळी दूर केली होती. मोदी त्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते तर अंकिताने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात राज्याच्या क्रीडा मंत्रलयाकडे मदतीसाठी संपर्क साधला होता.
आर्थिक अडचणीमुळे रैनाला 2क्13मध्ये विदेशामध्ये केवळ 11 स्पर्धामध्ये सहभागी होता आले, पण मोदी यांनी दखल घेतल्यानंतर यंदाच्या मोसमात पाच महिन्यांच्या कालावधीत अंकिता विदेशात सात स्पर्धामध्ये सहभागी झाली.
उजबेकिस्तानला रवाना होण्यापूर्वी अंकिता म्हणाली, ‘त्या वेळी मोदी यांनी आश्वासन दिले होते की, तू केवळ खेळत राहा. उर्वरित अडचणी सोडवण्यास आम्ही सक्षम आहोत.’ अंकिता पुढे म्हणाली, ‘त्या वेळी मी त्यांना भारताची अव्वल खेळाडू असून, अशी कामगिरी करणारी गुजरातची पहिली खेळाडू असल्याचे सांगितले होते. तसेच माङयाकडे प्रायोजक नसल्याची अडचण त्यांना कथन केली होती.
मी गुजरात क्रीडा प्राधिकरणचे महासंचालक संदीप प्रधान यांची भेट घेण्यासाठी गेलेली होती, पण अचानक मोदी यांच्यासोबत मुलाखत झाली. स्पर्धेसाठी प्रवासावर होणारा खर्च करणो खेळाडूंसाठी अडचणीचे ठरते. त्या वेळी त्यांनी माझी अडचण लक्षपूर्वक ऐकली. त्यानंतर राज्य सरकारच्या शक्तिदूत योजनेचा लगेच लाभ मिळाला. आजतागायत तिला 15 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळालेली आहे. - अंकिता रैना