जेव्हा हरभजन तामिळ आणि अश्विन पंजाबी बोलतो
By Admin | Updated: March 31, 2016 16:57 IST2016-03-31T16:55:35+5:302016-03-31T16:57:03+5:30
बीसीसीआयने हरभजन आणि आर अश्विनचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे ज्यामध्ये दोघेही एकमेकांना आपली भाषा शिकवत आहेत

जेव्हा हरभजन तामिळ आणि अश्विन पंजाबी बोलतो
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि.३१ - टी 20 वर्ल्डकपमुळे भारतीय क्रिकेट संघ सध्या जोरदार प्रॅक्टीस करत आहे. एकीकडे सर्व खेळाडू प्रॅक्टीस करण्याच व्यस्त आहेत तर दुसरीकडे हरभजन आणि आर अश्विन वेगळीच प्रॅक्टीस करत आहेत. दोघेही एकमेकांना भाषेची शिकवणी देत आहेत.
भारतीय क्रिकेट संघात वेगवेगळ्या राज्यातून आलेले क्रिकेटर्स आहेत. प्रत्येकाची संस्कृती, राहणीमान, भाषा वेगवेगळी आहे. हरभजन सिंग पंजाबचा असल्याचे त्याला पंजाबी बोलताना तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. मात्र हरभजन सिंग तामिळ भाषेत बोलला तर ऐकायला कसं वाटेल ? आणि दक्षिण भारतीय असलेल्या आर अश्विनला पंजाबी बोलताना ऐकलं तर ? नक्कीच धम्माल येईल. बीसीसीआयने हरभजन आणि आर अश्विनचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे ज्यामध्ये दोघेही एकमेकांना आपली भाषा शिकवत आहेत.
Just for laughs - When @ashwinravi99 spoke Punjabi and @harbhajan_singh tried Tamil. Full video soon #INDhttps://t.co/0HAt7Afh1l
— BCCI (@BCCI) March 30, 2016