‘केर्न्सने मॅक्युलमशी संपर्क केला, तेव्हा उपस्थित होतो’

By Admin | Updated: October 21, 2015 01:33 IST2015-10-21T01:33:52+5:302015-10-21T01:33:52+5:30

न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम याला माजी कर्णधार ख्रिस केर्न्स याच्याकडून व्यावसायिक आॅफर मिळाली होती. आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने लंडन येथील

When Cairns contacted McCulm, he was present. | ‘केर्न्सने मॅक्युलमशी संपर्क केला, तेव्हा उपस्थित होतो’

‘केर्न्सने मॅक्युलमशी संपर्क केला, तेव्हा उपस्थित होतो’

लंडन : न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम याला माजी कर्णधार ख्रिस केर्न्स याच्याकडून व्यावसायिक आॅफर मिळाली होती. आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने लंडन येथील न्यायालयात फिक्सिंगप्रकरणी साक्ष दिली.
केर्न्सविरुद्ध खोटी साक्ष दिल्याचा आरोप असून  याप्रकरणी पाँटिंगने आॅस्ट्रेलियाहून व्हिडीओ लिंकद्वारे साक्ष नोंदविली. पाँटिंग म्हणाला, २००८मध्ये मी भारतात मॅक्युलमसोबत हॉटेलमध्ये होतो. त्या वेळी मॅक्युलमला क्रेर्न्सचा फोन आला होता. केर्न्सच्या आॅफरवर मॅक्युलमने हा व्यावसायिक मुद्दा असल्याचे सांगताच केर्न्सने उत्तर देण्याचे टाळले. मॅक्युलमने केर्न्सची आॅफर स्पॉट फिक्सिंगशी संबंधित असल्याचे म्हटले होते.
पाँटिंग साक्षीदरम्यान म्हणाला, ‘आयपीएलच्या वेळी २००८मध्ये मी मॅक्युलमसोबत हॉटेल रूममध्ये होतो. त्याचवेळी फोन आला. त्या दोघांचे पाच मिनिटांपेक्षा कमी संभाषणही झाले.’ (वृत्तसंस्था)

Web Title: When Cairns contacted McCulm, he was present.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.