शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
4
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
5
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
6
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
7
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
8
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
9
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
10
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
11
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
12
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
13
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
14
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
15
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
16
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
17
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
18
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
19
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
20
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'त्या' भाषणात विनेश फोगाटचा उल्लेख; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 15:17 IST

शेवटच्या क्षणी अतिरिक्त वजनामुळे अपात्र ठरल्यामुळे तिनं कुस्तीच्या आखाड्यात मिळालेले पदक गमावलं

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक मुसंडी मारूनही पदकाशिवाय मायदेशी परतण्याची वेळ विनेश फोगाटवर आली आहे. शेवटच्या क्षणी अतिरिक्त वजनामुळे अपात्र ठरल्यामुळे कुस्तीच्या आखाड्यात मिळालेले पदक गमावलं. तरी तिची कामगिरी अविस्मरणीय ठरली, यात कुणाच्याही मनात शंका नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महिला कुस्तीपटू विनेश फोगाटची ऑलिम्पिकमधील कामगिरी उल्लेखनिय असल्याचे म्हटले आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंना संबोधित करत असताना विनेश फोगाटचा खास उल्लेख केला.  मोदी म्हणाले आहेत की,  "विनेशनं अंतिम फेरीपर्यंत पोहचत एक इतिहास रचला. फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात फायनल गाठणारी विनेश फोगाट ही पहिली भारतीय महिला आहे. तिची ही कामगिरी देखील अभिमानास्पद आहे."  

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी टोकियोच्या तुलनेत घसरली. जगातील मानाच्या स्पर्धेत भारत पदकांचा दुहेरी आकडा गाठेल, अशी अपेक्षा होती. पण वेगवेगळ्या खेळात मोक्याच्या क्षणी भारताच्या पदरी अपयश आले. त्यात विनेश फोगाटच्या रुपात मोठा धक्का बसला. १०० ग्रॅम वजन अतिरिक्त असल्यामुळे विनेशसह भारताच्या हाती आलेले पदक हुकलं. अंतिम लढती आधी ती अपात्र ठरली. या प्रकरणात विनेशनं क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती.  संयुक्त रौप्य पदकासाठी तिने जी याचिका दाखल केली होती ती फेटाळण्यात आली.  

भारताकडून पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ११७ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेनंतर बहुतांश खेळाडू मायदेशी परतले आहेत. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी वेगवेगळ्या खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेतली. नीरज चोप्रासह विनेश फोगाटचा यात समावेश नव्हता. कारण नीरज चोप्रा पॅरिसहून थेट जर्मनीला गेला आहे. विनेश फोगाट ही १७ ऑगस्टला मायदेशी परतणार असल्याचे समजते. नीरज आणि विनेश फोगाटशिवाय पीव्ही सिंधूही पंतप्रधानांच्या निवासस्थानी जमलेल्या ऑलिम्पिक खेळाडूंसोबत दिसली नाही. सिंधूला पॅरिसमध्ये हॅटट्रिकची संधी होती. पण तिला अपयशाचा सामना करावा लागला होता.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने १ रौप्य आणि ६ कांस्य पदकं जिंकली. नेमबाजीत सर्वाधिक पदकं मिळाली. यात मनू भाकर, सरबज्योत सिंग आणि स्वप्निल कुसाळे यांच्या यशस्वी कामगिरीचा समावेश आहे. अमन सेहरावत याने कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याला यावेळी रौप्यवरच समाधान मानावे लागले. याशिवाय हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक जिंकले. 

टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगटparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदी