शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
3
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
4
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
5
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
6
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
7
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
8
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
9
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
10
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
11
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
12
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
13
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
14
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
16
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
17
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
18
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
19
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार
20
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...

लेव्हिसच्या शतकाने विंडीज विजयी

By admin | Updated: July 10, 2017 01:22 IST

११२ धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर वेस्ट इंडिजने रविवारी खेळल्या गेलेल्या एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा ९ गडी व ९ चेंडू राखून पराभव केला.

किंग्स्टन : एव्हिन लेव्हिसची (नाबाद १२५ धावा, ६२ चेंडू, ६ चौकार, १२ षटकार) शतकी खेळी व त्याने मार्लोन सॅम्युअल्ससह (नाबाद ३६) दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या ११२ धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर वेस्ट इंडिजने रविवारी खेळल्या गेलेल्या एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा ९ गडी व ९ चेंडू राखून पराभव केला. भारताने ६ बाद १९० धावांची दमदार मजल मारली होती. विंडीजने विजयासाठी आवश्यक धावा १८.३ षटकांत एक गडी गमावित पूर्ण केल्या. भारतातर्फे कुलदीप यादवचा अपवाद वगळता अन्य गोलंदाजांची पाटी कोरीच राहिली. कुलदीपने ख्रिस गेलला (१८) माघारी परतवले.त्याआधी, आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर भारताने ६ बाद १९० धावांची दमदार मजल मारली. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आल्यानंतर विराट कोहली (३९ धावा, २२ चेंडू) आणि शिखर धवन (२३ धावा, १२ चेंडू) यांनी सलामीला ६४ धावांची भागीदारी करीत चांगली सुरुवात करून दिली. तीन चेंडूंच्या अंतरात हे दोघेही माघारी परतल्यानंतर दिनेश कार्तिक (४८ धावा, २९ चेंडू, ५ चौकार, ३ षटकार) आणि ऋषभ पंत (३८ धावा, ३५ चेंडू) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८६ धावा जोडल्या. रवींद्र जडेजा (नाबाद १३) व रविचंद्रन अश्विन (नाबाद ११) यांनी संघाला १९० धावांची मजल मारून दिली. विंडीजतर्फे जेरोम टेलर व केसरिक विलियम्स यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. >संक्षिप्त धावफलकभारत :- विराट कोहली झे. नरेन गो. विलियम्स ३९, शिखर धवन धावबाद २३, ऋषभ पंत झे. वालटन गो. टेलर ३८, दिनेश कार्तिक त्रि. गो. सॅम्युअल्स ४८, महेंद्रसिंग धोनी झे. सॅम्युअल्स गो. टेलर ०२, केदार जाधव झे. नरेन गो. विलियम्स ०४, रवींद्र जडेजा नाबाद १३, रविचंद्रन अश्विन नाबाद ११. अवांतर (१२). एकूण २० षटकांत ६ बाद १९०. गोलंदाजी : बद्री ४-०-३१-०, टेलर ४-०-३१-२, विलियम्स ४-०-४२-२, ब्रेथवेट २-०-२६-०, नरेन ३-०-२२-०, सॅम्युअल्स ३-०-३२-१.वेस्ट इंडिज :- ख्रिस गेल झे. धोनी गो. कुलदीप १८, एव्हिन लेव्हिस नाबाद १२५, मार्लोन सॅम्युअल्स नाबाद ३६. अवांतर (१५). एकूण १८.३ षटकांत १ बाद १९४. गोलंदाजी : भुवनेश्वर ४-०-२७-०, अश्विन ४-०-३९-०, शमी ३-०-४६-०, कुलदीप ४-०-३४-१, जडेजा ३.३-०-४१-०.