ख्रिस गेलच्या तुफान खेळीमुऴे वेस्ट इंडिजचा विजय

By Admin | Updated: March 16, 2016 23:20 IST2016-03-16T23:02:41+5:302016-03-16T23:20:24+5:30

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलच्या तुफान खेळीमुळे वेस्ट इंडिजने इंग्लडवर सहा गडी राखून विजय मिऴविला.

West Indies win by Chris Gayle | ख्रिस गेलच्या तुफान खेळीमुऴे वेस्ट इंडिजचा विजय

ख्रिस गेलच्या तुफान खेळीमुऴे वेस्ट इंडिजचा विजय

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - टी-२० वर्ल्डकपच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलच्या तुफान खेळीमुळे वेस्ट इंडिजने इंग्लडवर सहा गडी राखून विजय मिऴविला. 
या सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजला २० षटकात १८२ धावांचे आव्हान दिले होते. याचा पाठलाग करताना  वेस्ट इंडिजने १८.१ षटकात १८३ धावा केल्या. ख्रिस गेलने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करत ४८ चेंडूत ५ चौकार आणि ११ षटकार लगावत नाबाद शतकी खेळी केली. 
 तर मार्लन सॅम्युअल्सने २७ चेंडूत ८ चौकार लगावत ३७ धावा केल्या.ड्वेन ब्राव्होने २, दिनेश रामदीनने १२ आणि आंद्रे रसेलने १६ धावा केल्या, तर जॉन्सन चार्ल्स शून्य धावेवर बाद झाला. 
 
 

Web Title: West Indies win by Chris Gayle