खेळण्यास विंडीज संघ तयार नव्हता : ठाकूर

By Admin | Updated: October 18, 2014 00:45 IST2014-10-18T00:45:13+5:302014-10-18T00:45:13+5:30

आर्थिक वादामुळे भारताविरुद्ध शुक्रवारी खेळला जाणारा चौथा वन-डे सामना जवळजवळ रद्द होणार असल्याचे संकेत मिळत होते;

West Indies team was not ready to play: Thakur | खेळण्यास विंडीज संघ तयार नव्हता : ठाकूर

खेळण्यास विंडीज संघ तयार नव्हता : ठाकूर

धर्मशाला : वेस्ट इंडीजचे खेळाडू आणि त्यांची संघटना (डब्ल्यूआयपीए) यांच्यादरम्यान सुरू असलेल्या आर्थिक वादामुळे भारताविरुद्ध शुक्रवारी खेळला जाणारा चौथा वन-डे सामना जवळजवळ रद्द होणार असल्याचे संकेत मिळत होते; पण अखेर बीसीसीआयचे सहसचिव अनुराग ठाकूर यांनी हस्तक्षेप केल्यामुळे पाहुणा संघ मैदानात दाखल झाला.
मैदानावर खेळाडूंच्या विरोधाचे संकेत मिळाले. नाणोफेकीच्या वेळी विंडीज संघातील र्सवच खेळाडू ड्वेन ब्राव्होच्या पाठीमागे उभे असल्याचे चित्र दिसले. दुपारी 2.3क् वाजता प्रारंभ होणा:या लढतीसाठी विंडीज संघ दुपारी 1 वाजताच्या सुमारास एचपीसीए स्टेडियममध्ये पोहोचला. त्यांनी अध्र्यातासापेक्षा अधिक वेळ सराव केला नाही. दरम्यान, सर्वकाही नाटय़मय घडामोडी हॉटेलमध्ये घडल्या. सामन्याच्या तीन तासांपूर्वी अनुराग ठाकूर वेस्ट इंडीजच्या खेळाडूंची मनधरणी करण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. बीसीसीआयचे वरिष्ठ पदाधिकारी व एचपीसीएचे अधिकारी म्हणून ठाकूर यांनी ब्राव्हो व त्याच्या सहका:यांची सामना खेळण्यासाठी मनधरणी केली. जर तुम्ही सामना न खेळण्याचा निर्णय घेतला तर एचपीसीए तुमचे यजमानपद स्वीकारणार नाही आणि सर्व सोयी तुम्हाला स्वत: कराव्या लागतील, असे सांगितल्यानंतर खेळाडू थोडे नरमले. 
बैठकीबाबत सामना सुरू होण्यापूर्वी सूत्रने सांगितले की, ‘सामना होण्याची शक्यता कमी आहे. विंडीज संघाने मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, पण ठाकूर यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी संघासोबत चर्चा केली. त्यात ब्राव्हो, सपोर्ट स्टाप रिची रिचर्डस्न, कर्टली अॅम्ब्रोस आणि अन्य खेळाडूंचा समावेश होता. बैठकीमध्ये र्सवच सहभागी झाले होते. ठाकूर म्हणाले की, सर्व व्यवस्था झालेली आहे. तिकीट विकल्या गेलेल्या आहेत. लोक लांब अंतरावरून सामना बघण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सामना खेळावा, पण तरी तुम्ही सामना खेळणार नसला तर सर्व जबाबदारी तुमची असेल. तुम्ही माङो पाहुणो राहणार नाही.’
विंडीज संघात सर्वकाही ऑलवेल नसल्याची कल्पना आली. खेळाडूंच्या गराडय़ात असलेल्या ब्राव्होने नाणोफेकीच्या वेळी सांगितले की,‘माझा संघ माङो मागे उभा आहे. हा आमच्यासाठी खडतर दौरा ठरला आहे. क्रिकेटचे नुकसान व्हावे, असे आम्हाला वाटत नाही. त्याचप्रमाणो आमच्या चाहत्यांना याची झळ बसावी, असेही वाटत नाही. आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. खेळाडूंनी शानदार कामगिरी केली, त्याचे त्यांना श्रेय द्यावेच लागेल. ’ वेस्ट इंडीज संघाचे मीडिया व्यवस्थापक फिलिप स्पूनर यांनी हॉटेलमध्ये जे काही घडले त्याबाबत काही सांगण्यास नकार दिला. स्पूनर म्हणाले,‘विंडीज संघ खेळण्यासाठी आलेले आहे, याची मला कल्पना आहे.’ (वृत्तसंस्था)   
 
 
विंडीज खेळाडूंच्या सहभागाची समीक्षा होणार
4नवी दिल्ली : विंडीजच्या खेळाडूंनी बोर्डासोबत वेतनावरून झालेल्या वादामुळे भारत दौरा अर्धवट सोडला. यामुळे नाराज झालेल्या बीसीसीआयने आयपीएलमध्ये या खेळाडूंचे प्रतिनिधित्व ठेवायचे किंवा नाही, याबाबत गंभीर समीक्षा करण्याचे संकेत दिले आहेत. कॅरेबियन खेळाडूंनी जो पवित्र घेतला, त्यावर बीसीसीआय इतकी नाराज आहे, की या खेळाडूंबाबत कठोर निर्णय घेण्यासही आता मागेपुढे पाहणार नाही. हा मुद्दा आयपीएल संचालन परिषदेत उपस्थित केला जाईल. बोर्डाचे पदाधिकारी विंडीजच्या खेळाडूंवर किमान एका सत्रसाठी बंदी घालण्याच्या विचारात आहेत. गेल, पोलार्ड आणि ड्वेन ब्राव्होसारख्या खेळाडूंसाठी आयपीएल उत्पन्नाचे मुख्य साधन आहे.
4भारतीय प्रेक्षकांनी त्यांना दिलेल्या प्रेमाची ते कल्पनाही करू शकत नाहीत. याच खेळाडूंनी पाठीत खंजीर खुपसला, असा बोर्डाचा समज झाल्याची माहिती ज्येष्ठ पदाधिका:याने दिली. बोर्डाचे सचिव संजय पटेल हे विंडीजच्या खेळाडूंची समजूत घालण्यासाठी कोची येथे जाऊन आले. त्यांनी आश्वासन दिल्यानंतरही विंडीजच्या खेळाडूंनी दुर्लक्ष केले; त्यामुळे ते कारवाईस पात्र ठरतात. पण, विंडीजच्या खेळाडूंना शिक्षा देताना बोर्डाला या खेळाडूंचा समावेश असलेल्या चेन्नई आणि मुंबई इंडियन्सकडेही लक्ष द्यावे लागेल. ब्राव्हो व स्मिथ हे चेन्नईसाठी, तर पोलार्ड मुंबईसाठी खेळतो. नरेन व गेल ही आयपीएलमध्ये खेळतात. 
 
विंडीजने दौरा अर्धवट सोडून माघार घेतल्यानंतर ही उणीव भरून काढण्यासाठी लंका संघ भारतात दाखल होत आहे. श्रीलंका क्रिकेटचे सचिव निशांत रणतुंगा यांनी, ’’आम्ही उणीव भरून काढू,’’ असे म्हटले आहे. लंकेचा दौरा निश्चित असून, कार्यक्रम अद्याप ठरलेला नाही; पण दौ:याचा अधिकृत निर्णय लवकरच घेतला जाईल, असे रणतुंगा यांनी सांगितले.
 
जर सामना रद्द झाला तर आयोजकांसाठी ती लाजिरवाणी बाब ठरेल. लांब अंतरावरून सामना बघण्यासाठी येथे आलेले चाहते निराश होतील, असे ठाकूर म्हणाल़े

 

Web Title: West Indies team was not ready to play: Thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.