वेस्ट इंडिजचा पराभव
By Admin | Updated: October 11, 2014 22:41 IST2014-10-11T22:41:59+5:302014-10-11T22:41:59+5:30
भारतविरूध्द वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुस-या वन-डे सामन्यात वेस्ट इंडिजचा ४८ धावाने पराभव केला. भारताने हा विजय मिळाल्याने सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली आहे.

वेस्ट इंडिजचा पराभव
>ऑनलाइन लोकमत
दिल्ली, दि. ११ - भारतविरूध्द वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुस-या वन-डे सामन्यात वेस्ट इंडिजचा ४८ धावाने पराभव केला. भारताने हा विजय मिळाल्याने सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली आहे.
भारताने ठेवलेल्या २६४ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजचा संघाला हे आव्हान पेलता आले नाही. वेस्ट इंडिजचा संघ केवळ २१५ धावाच करू शकला. वेस्ट इंडिजसंघाकडून सर्वाधिक ९७ धावा स्मीथने केल्या. ब्राव्हो २६, पोलार्ड ४० धावा वगळता वेस्ट इंडिजच्या अन्य खेळाडूला धावा करता आल्या नाही. भारताकडून सर्वाधिक ४ विकेट मोहम्मद शामीने तर रवींद्र जाडेजाने ३ विकेट घेतल्या. अमित मिश्राने २ तर यादवला १ गडी बाद करण्यात यश मिळाले.