वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड गुंडाळण्याचे दिग्गजांचे आवाहन

By Admin | Updated: April 21, 2016 04:12 IST2016-04-21T04:12:26+5:302016-04-21T04:12:26+5:30

देशात क्रिकेटचा स्तर घसरण्याला वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड जबाबदार असून बोर्डाची ताबडतोब गच्छंती व्हावी, अशी मागणी विंडीजच्या माजी दिग्गज खेळाडूंनी केली आहे.

The West Indies Cricket Board | वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड गुंडाळण्याचे दिग्गजांचे आवाहन

वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड गुंडाळण्याचे दिग्गजांचे आवाहन

ग्रेनेडा : देशात क्रिकेटचा स्तर घसरण्याला वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड जबाबदार असून बोर्डाची ताबडतोब गच्छंती व्हावी, अशी मागणी विंडीजच्या माजी दिग्गज खेळाडूंनी केली आहे. बोर्ड गुंडाळून त्याऐवजी अंतरिम बोर्डाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणीदेखील करण्यात आली.
महान खेळाडू गॅरी सोबर्स, विव्हियन रिचर्ड्स वेस्ले हॉल, अँडी रॉबर्ट्स हे ग्रेनेडाचे पंतप्रधान कीथ मिशेल यांना भेटले. कीथ हे विंडीज क्रिकेटच्या संचालनासाठी स्थापण्यात आलेल्या पंतप्रधानांच्या समितीचेदेखील अध्यक्ष आहेत. याच समितीने आॅक्टोबर २०१४मध्ये विंडीजचा भारत दौरा मध्येच रद्द झाल्यानंतर उद्भवलेल्या संकटकाळात केरीकोम क्रिकेट समीक्षा समितीची स्थापना केली होती.

Web Title: The West Indies Cricket Board