वेस्ट इंडिजचा आॅस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2016 00:52 IST2016-03-14T00:52:57+5:302016-03-14T00:52:57+5:30

कर्णधार डॅरेन सॅमी (नाबाद ५०) आणि क्रेग ब्रॅथवेट (३३) यांच्या शानदार खेळीने वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडच्या सुरेख हॅट्ट्रिकवर पाणी फेरले आणि वेस्ट इंडिजने आॅस्ट्रेलियाला ट्वेंटी

West Indies beat Australia in thrilling win | वेस्ट इंडिजचा आॅस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय

वेस्ट इंडिजचा आॅस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय

कोलकाता : कर्णधार डॅरेन सॅमी (नाबाद ५०) आणि क्रेग ब्रॅथवेट (३३) यांच्या शानदार खेळीने वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडच्या सुरेख हॅट्ट्रिकवर पाणी फेरले आणि वेस्ट इंडिजने आॅस्ट्रेलियाला ट्वेंटी-२० वर्ल्डकपच्या सराव सामन्यात रविवारी एक चेंडू आणि तीन विकेट्सने पराभूत केले.
आॅस्ट्रेलियाने सलामीवीर शेन वॉट्सनच्या ६० धावांच्या खेळीच्या बळावर ९ बाद १६१ अशी मजबूत धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने १९.५ षटकांत ७ बाद १६२ धावा केल्या. सॅमी आणि ब्रेथवेट जोडीने सातव्या गड्यासाठी ५३ धावांची निर्णायक भागीदारी केली.
संक्षिप्त धावफलक : आॅस्ट्रेलिया : २० षटकांत ९ बाद १६१. (शेन वॉट््सन ६०, स्मिथ ३६, फिंच ३३. ब्राव्हो ४/२१, बेन ३/३७, ब्रेथवेट २/१५); वेस्ट इंडिज : १९.५ षटकांत ७ बाद १६२. (डॅरेन सॅमी नाबाद ५०, ब्रेथवेट ३३, रसेल २९, हेजलवूड ३/१३). (वृत्तसंस्था)

Web Title: West Indies beat Australia in thrilling win