वेस्ट इंडिजचा खेळाडू डॅरेन सॅमीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
By Admin | Updated: May 10, 2014 13:57 IST2014-05-10T13:57:09+5:302014-05-10T13:57:27+5:30
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू डॅरेन सॅमी याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.

वेस्ट इंडिजचा खेळाडू डॅरेन सॅमीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि.१० - वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू डॅरेन सॅमी याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. कसोटी संघाचा कर्णधार म्हणून रामदिन याची निवड झाल्यामुळे सॅमीने हा तडकाफडकी निर्णय घेतल्याचे समजते.
सॅमी आता कसोटी संघाचा कर्णधार राहिला नसला तरी वन-डे व टी-२० क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अद्याप तोच आहे. ३० वर्षांच्या सॅमीने आत्तापर्यंत ३८ कसोटी सामने खेळले असून त्याने निवृत्तीचा निर्णय वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाला कळवला आहे.