शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
6
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
7
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
8
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
9
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
10
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
11
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
12
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
13
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
14
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
15
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
16
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
17
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
18
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
19
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
20
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना

'पश्चिम भारतातील राज्यांना शरीरसौष्ठवाची ताकद बनविणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 20:22 IST

मुंबई, महाराष्ट्रापाठोपाठ पश्चिम भारताचीही सुत्रे अजय खानविलकर यांच्याकडे

मुंबई : भारतातील सर्वात बलाढ्य राज्य संघटना आणि जिल्हा संघटनेचे प्रमुख पद संपादणाऱया अजय खानविलकर यांच्याकडे आता पश्चिम भारत शरीरसौष्ठव संघटनेचेही सरचिटणीस पद सोपविण्यात आले आहे. मुंबई आणि महाराष्ट्राला भारतातील सर्वशक्तिमान संघटेनेचा लौकिक मिळवून देणाऱया खानविलकरांनी पश्चिम भारतातील राज्यांनाही भारतीय शरीरसौष्ठवाची ताकद बनविण्याचे ध्येय बाळगले आहे. पद मिळताच त्यांनी आपल्यिा अनोख्या शैलीत कामाचा श्रीगणेशा केला आहे.आज भारतातील सर्वात बलशाली जिल्हा संघटना म्हणून मुंबईचा दबदबा आहे. भारतातील सर्वाधिक शरीरसौष्ठवपटू मुंबईतूनच तयार होतात आणि तेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्याचे आणि देशाचे नाव झळकावत आहेत. पुढेही तसेच होणार, पण आता मुंबईसारखं बलशाली पश्चिम भारतात असलेल्यिा गुजरात, गोवा, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यातील खेळाडूंनाही करण्याचा माझा मानस आहे. मुंबई-महाराष्ट्राकडे पाहिल्यिावर प्रत्येक राज्याला वाटतं की शरीरसौष्ठवात आपलीही अशीच प्रगती व्हावी. आगामी काळात पश्चिम भारतातील राज्यांकडे पाहिल्यिावर प्रत्येकजण असेच बोलेल. आपल्यिा कार्यकालात पश्चिम भारतातील शरीरसौष्ठवाला आणि शरीरसौष्ठवपटूंना उत्तेजन आणि प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा आणि शिबीरे आयोजित केली जाणार असल्यिाची माहितीही खानविलकर यांनी दिली.एवढेच नव्हे तर ज्या खेळाडूंमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्याची क्षमता आहे, अशा गुणवान आणि बलवान खेळाडूंना मार्गदर्शनाबरोबर आर्थिक बळ देण्याची योजनाही आपण लवकरच सुरू करणार आहोत. सध्या यासाठी प्राथमिक स्तरावर खेळाडूंची निवड करण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. शरीरसौष्ठवात सर्वच पातळीवर महाराष्ट्राची ताकद दिसतेय. राष्ट्रीय असो किंवा आंतरराष्ट्रीय संघटना साऱयाच ठिकाणी राज्याचे संघटक महत्त्वाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत. भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे सर्वेसर्वा चेतन पाठारे यांनी मला दिलेली जबाबदारी मी प्रभावीपणे यशस्वीरित्या सांभाळेन, असा विश्वासही अजय खानविलकर यांनी सरचिटणीसपदाची सुत्रे सांभाळल्यिानंतर बोलून दाखविला.लवकरच पश्चिम भारत श्रीभारतीय शरीरसौष्ठवाची ताकद वाढावी म्हणून राष्ट्रीय संघटनेने विभागीय संघटनांना पुनरुज्जीवीत करण्याचे काम हाती घेतलेय. त्याच अनुषंगाने पश्चिम भारत शरीरसौष्ठव संघटनेची जबाबदारी माझ्याकडे सोपविण्यात आली आहे. शरीरसौष्ठवाचा खेळ मुंबई-महाराष्ट्रात जसा वाढला तसाच या राज्यांमध्ये वाढविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. मुंबईने गेल्यिा चार वर्षात अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांचे भव्यदिव्य आयोजन करून आपली ताकद अवघ्या देशाला दाखवून दिली आहे. आता त्याच धर्तीवर पश्चिम भारतातही त्याच जोशाने स्पर्धा आयोजित करण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत. पश्चिम भारत श्रीने याचा आम्ही श्रीगणेशा करणार आहोत. यात महाराष्ट्रासह इतर राज्येही पूर्ण ताकदीने उतरावीत, हेच आमचे प्रमुख ध्येय आहे. आम्हाला फक्त स्पर्धाच आयोजित करायच्या नाहीत तर शरीरसौष्ठवाची आणि फिटनेसची केझही पश्चिम भारतातील राज्यांमध्ये वाढवायचीय, असेही सरचिटणीस खानविलकर म्हणाले.पश्चिम भारत शरीरसौष्ठव संघटनेवर महाराष्ट्राचे वर्चस्वपूर्ण भारतीय शरीरसौष्ठवावर महाराष्ट्राचे वर्चस्व आहे. तसेच वर्चस्व पश्चिम विभागीय संघटनेवरही दिसून येत आहे. नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी मदन कडू यांची वर्णी लागली आहे तर आयोजन सचिवाच्या भूमिकेत राज्याचे शरद मारणे आणि राजेंद्र कुशवाह दिसतील. चेतन पाठारे आणि प्रशांत आपटे हे दिग्गज सदस्य आहेत तर विक्रम रोठे यांच्यावर कायदेशीर सललगाराची भूमिका सोपविण्यात आली आहे.पश्चिम भारत शरीरसौष्ठव संघटना नवी कार्यकारिणीअध्यक्ष : तुलसी सुजन (गुजरात),कार्यकारी उपाध्यक्ष: प्रेमसिंग यादव (मध्य प्रदेश),उपाध्यक्ष : शैलेंद्र व्यास ( मध्यप्रदेश), एम. के. शर्मा (गुजरात), संजय पाटील ( गोवा), मदन कडू (महाराष्ठ्र)सरचिटणीस : अजय खानविलकर (महाराष्ट्र),कोषाध्यक्ष : अरविंद सिंग (छत्तीसगड)संयुक्त सचिव : राजशेखर राव (छत्तीसगड), विजय पांचाल ( गुजरात), राजेश तोमर (विदर्भ)आयोजन सचिव : अतिन तिवारी (मध्यप्रदेश), शरद मारणे (महाराष्ट्र), राजेंद्र चव्हाण (महाराष्ट्र), जीतेंद्र कुशवाह (मध्यप्रदेश).सदस्य : चेतन पाठारे (महाराष्ट्र), प्रशांत आपटे (महाराष्ट्र)कायदेशीर सललगार : विक्रम रोठे

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवMaharashtraमहाराष्ट्र