‘विराट अॅण्ड कंपनी’ला रोखण्याची आमच्याकडे योजना : भुवी
By Admin | Updated: May 29, 2016 00:25 IST2016-05-29T00:25:23+5:302016-05-29T00:25:23+5:30
रविवारी खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीत रॉयल चॅलेंजर्सचा बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला रोखण्याची रणनीती तयार आहे, असे मत आयपीएलच्या नवव्या पर्वात सर्वाधिक २३ बळी

‘विराट अॅण्ड कंपनी’ला रोखण्याची आमच्याकडे योजना : भुवी
बेंगळुरू : रविवारी खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीत रॉयल चॅलेंजर्सचा बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला रोखण्याची रणनीती तयार आहे, असे मत आयपीएलच्या नवव्या पर्वात सर्वाधिक २३ बळी घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत सर्वांत आघाडीवर असलेला सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने व्यक्त केले.
भुवनेश्वर म्हणाला,‘शानदार फॉर्मात असलेल्या विराटला रोखण्यासाठी आम्ही निश्चितच योजना आखली आहे. विराट विश्वदर्जाचा फलंदाज असल्याची प्रत्येकाला कल्पना आहे. सध्या तो शानदार फॉर्मात आहे. त्याला गोलंदाजी करणे कुठल्याही गोलंदाजीसाठी सध्या कठीण बाब आहे.’ २३ बळी घेणारा भुवी पुढे म्हणाला,‘प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळताना स्वत: चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक असतो. आम्ही केवळ विराटच नाहीतर एबी डिव्हिलियर्स व ख्रिस गेल यांच्यासाठीही रणनीती तयार केली आहे. अंतिम लढतीत आमची रणनीती यशस्वी ठरेल, अशी आशा आहे.’ कामगिरीबाबत बोलताना भुवनेश्वर म्हणाला,‘माझा नेहमी स्विंग गोलंदाजीवर विश्वास असतो. मी सुरुवातीला स्विंग मारा करण्यावर आणि डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर टाकण्याची रणनीती वापरतो.’ (वृत्तसंस्था)