गॅस्केटकडून वावरिन्का पराभूत

By Admin | Updated: July 10, 2015 01:48 IST2015-07-10T01:48:44+5:302015-07-10T01:48:44+5:30

एकविसावा मानांकित फ्रान्सचा रिचर्ड गॅस्केट याने पुरुषांच्या एकेरीत चौथा मानांकित स्वित्झर्लंडचा स्टॅन वावरिन्का याचा पाच सेटमध्ये पराभव करून

Wawrinka lost by gasket | गॅस्केटकडून वावरिन्का पराभूत

गॅस्केटकडून वावरिन्का पराभूत

लंडन : एकविसावा मानांकित फ्रान्सचा रिचर्ड गॅस्केट याने पुरुषांच्या एकेरीत चौथा मानांकित स्वित्झर्लंडचा स्टॅन वावरिन्का याचा पाच सेटमध्ये पराभव करून प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत खळबळ उडवून देत उपांत्य फेरीतील आपली जागा निश्चित केली. दुसरीकडे, सर्बियाच्या नोवाक जाकोविचने क्रोएशियाच्या मरिन सिलीकला नमवून अंतिम चारमध्ये प्रवेश केला.
रिचर्ड गॅस्केटने स्टॅन वावरिन्काला ३ तास
२७ मिनिटे चाललेल्या लढतीत ६-४, ४-६, ३-६, ६-४, ११-९ असे पराभूत केले. रिचर्डची पुढील लढत अग्रमानांकित नोव्हाक जोकोविचशी होईल. पुरुषांच्या दुसऱ्या लढतीत अग्रमानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने क्रोएशियाच्या मरिन
सिलिकला ६-४,६-४,६-४ असे १ तास
४९ मिनिटांत नमविले.
पुरुष एकेरीची पहिली उपांत्य लढत नोव्हाक जोकोविच विरुद्ध रिचर्ड गॅस्केट आणि दुसरी लढत रॉजर फेडरर विरुद्ध अँडी मरे अशी होईल.

Web Title: Wawrinka lost by gasket