वॉटसनची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

By Admin | Updated: September 7, 2015 00:13 IST2015-09-07T00:13:49+5:302015-09-07T00:13:49+5:30

आॅस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू शेन वॉटसनने रविवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत असल्याची घोषणा केली. या ३४ वर्षीय क्रिकेटपटूने कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना

Watson retires from Test cricket | वॉटसनची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

वॉटसनची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

लंडन : आॅस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू शेन वॉटसनने रविवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत असल्याची घोषणा केली. या ३४ वर्षीय क्रिकेटपटूने कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध कार्डिफमध्ये खेळला. त्या लढतीत आॅस्ट्रेलिया संघाला १६९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. वॉटसनने त्या लढतीत ३० व १९ धावा केल्या होत्या आणि बळी घेण्यात त्याला यश मिळाले नव्हते. त्यामुळे मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी त्याची अंतिम संघात निवड झाली नव्हती. क्रिकेट आॅस्ट्रेलियाच्या अधिकृत वेबसाईटवर वॉटसनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.
वॉटसन म्हणाला, ‘मी पूर्ण विचार केल्यानंतरच हा निर्णय घेतला आहे. निवृत्ती स्वीकारण्याची ही योग्य वेळ आहे. मला अद्याप वन-डे व टी-२० मध्ये खेळण्याची आशा आहे. माझ्यासह माझे कुटुंबीय व संघासाठी चांगले काय, अशा प्रश्नांचे माझ्या डोक्यात काहूर माजले होते. गेल्या दोन दिवसांमध्ये मला या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळाले. मी कसोटी क्रिकेट खेळताना सर्वोत्तम प्रयत्न केला, असे माझे वैयक्तिक मत आहे.’ वॉटसनने एक कसोटी व ९ वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील उर्वरित वन-डे सामन्यांत तो खेळू शकणार नाही.

Web Title: Watson retires from Test cricket