वॉटलिंगचे शतक न्यूझीलंड ६/३३८
By Admin | Updated: June 1, 2015 01:48 IST2015-06-01T01:48:24+5:302015-06-01T01:48:24+5:30
बी.जे. वॉटलिंगच्या (१00*) तडाखेबंद नाबाद शतकाच्या जोरावर न्यूझिलंडने इंग्लडला जोरदार प्रत्यत्तुर दिले. दिवसभराचा खेळ संपला

वॉटलिंगचे शतक न्यूझीलंड ६/३३८
लीड्स : बी.जे. वॉटलिंगच्या (१00*) तडाखेबंद नाबाद शतकाच्या जोरावर न्यूझिलंडने इंग्लडला जोरदार प्रत्यत्तुर दिले. दिवसभराचा खेळ संपला तेंव्हा न्यूझिलंडने ६ बाद ३३८ धावा केल्या होत्या. वॉटलिंग १०० धावांतर तर मार्क क्रेग पंधरा धावांवर खेळत होते.
तत्पुर्वी, पहिल्या डावात इंग्लडने स्टुअर्ट ब्रॉडच्या ४६ धावांच्या खेळीमुळे न्यूझीलंडप्रमाणेच ३५० धावापर्यंत मजल मारली. त्यानंतर त्यांनी न्यूझीलंडला दुसऱ्या डावात २ बाद २३ अशा संकटात आणले होते. मात्र वॉटलिंगने शतक झळकावत इंग्लडला जोरदार उत्तर दिले.
मार्टिन गुप्टिल (७०) आणि रॉस टेलर (४८) यांनी तिसऱ्या गड्यासाठी ८७ चेंडूंत ९९ धावांची भागीदारी केली. या जोडीने न्यूझीलंडला सावरले. डरहमचा जलदगती गोलंदाज वूड याने गुप्टिल आणि टेलर या दोघांनाही पाच षटकांच्या आत बाद करीतमोठा धक्का दिला. न्यूझीलंडची चहापानापर्यंत ४ बाद १४३ धावा अशी अवस्था होती.
त्यानंतर ब्रॅँडन मॅक्युलम व बीजे वाटलिंग यांनी डावाची सुत्रे हाती घेतली. मॅक्युलमने ९८ चेंडूत १ षटकार व तीन चौकारांच्या साह्याने ५५ धावा केल्या. वूडच्या चेंडूवर मॅक्यूलम पायचित झाला. मॅक्युलमच्या जागी आलेल्या रॉंचीने वाटलिंगला चांगलीच साथ दिली. एका बाजूने टिच्चून फलंदाजी करत असलेल्या वाटलिंगने १३६ चेंडूत नाबाद १00 धावा केल्या. रॉंची ३१ धावा काढून बाद झाला.
लॉर्डसमध्ये पहिला कसोटी सामना १२४ धावांनी गमावल्यानंतर न्यूझीलंडला दोन कसोटी सामन्यांची मालिका ड्रॉ करण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल.