वासिम अक्रम, शोएब अख्तरचा मुंबईतील सामन्यात कॉमेंट्री करण्यास नकार
By Admin | Updated: October 20, 2015 09:26 IST2015-10-20T09:25:19+5:302015-10-20T09:26:33+5:30
शिवसेनेच्या पाकिस्तानविरोधी धोरणामुळे पाकिस्तानचे माजी खेळाडू वसिम अक्रम आणि शोएब अख्तरने मुंबईतील वन-डे सामन्यात कॉमेंट्री करण्यास नकार दिला आहे.

वासिम अक्रम, शोएब अख्तरचा मुंबईतील सामन्यात कॉमेंट्री करण्यास नकार
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - शिवसेनेच्या पाकिस्तानविरोधी धोरणामुळे पाकिस्तानचे माजी खेळाडू वसिम अक्रम आणि शोएब अख्तरने मुंबईतील वन-डे सामन्यात कॉमेंट्री करण्यास नकार दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांच्याविरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काल बीसीसीआय कार्यालयात केलेल्या आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या २५ ऑक्टोबर रोजी मुंबईत भारत वि. दक्षिण आफ्रिकेदरम्यान शेवटचा एकदिवसीय सामना पार पडणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी वसिम अक्रम व शोएब अख्तर पाकिस्तानला परत जाणार आहेत. दरम्यान शिवसेनेच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी पंच अलीम दार भारत- दक्षिण आफ्रिका मालिकेतून बाहेर पडले असून त्यांनाही मुंबईतील सामन्यात अंपायरिंग करू न देण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. अलीम दार हे चेन्नई व मुंबईतील सामन्यात अंपायरींग करणार होते. मात्र, मुंबईतील परिस्थिती पाहता आयसीसीने त्यांना अंपायरिंग न करण्यास सांगितले आहे.