वॉर्न्स वॉरियर्सची सचिन ब्लास्टर्सवर मात
By Admin | Updated: November 8, 2015 23:43 IST2015-11-08T23:43:49+5:302015-11-08T23:43:49+5:30
स्टेडियममध्ये ‘सचिन.. सचिन..’चा जयघोष असला तरी सचिन तेंडुलकरचा संघ सचिन ब्लास्टर्सला येथे क्रिकेट आॅल स्टार्स टी-२० मालिकेच्या पहिल्या लढतीत शेन वॉर्नच्या वॉर्न्स वॉरियर्सविरुद्ध ६

वॉर्न्स वॉरियर्सची सचिन ब्लास्टर्सवर मात
न्यूयॉर्क : स्टेडियममध्ये ‘सचिन.. सचिन..’चा जयघोष असला तरी सचिन तेंडुलकरचा संघ सचिन ब्लास्टर्सला येथे क्रिकेट आॅल स्टार्स टी-२० मालिकेच्या पहिल्या लढतीत शेन वॉर्नच्या वॉर्न्स वॉरियर्सविरुद्ध ६ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला.
येथील बेसबॉल स्टेडियममध्ये सामना बघण्यासाठी दाखल झालेल्या आशियाई प्रेक्षकांमध्ये सचिनच्या चाहत्यांची संख्या अधिक होती, पण वॉरियर्सच्या विजयात वॉर्नची पूर्वीची जादू अनुभवायला मिळाली.
सचिन ब्लास्टर्सने दिलेले १४१ धावांचे लक्ष्य वॉर्न्स वॉरियर्सने ४ गड्यांच्या मोबदल्यात १६ चेंडू राखून पूर्ण केले. रिकी पॉन्टिंग (नाबाद ४८) आणि कुमार संगकारा (४१) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी करीत वॉर्न्स वॉरियर्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. शेन वॉर्नने २० धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. त्यात तेंडुलकर आणि विंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा यांचा समावेश आहे. ब्लास्टर्सतर्फे वीरेंद्र सेहवागने मालिकेतील पहिले अर्धशतक २० चेंडूंमध्ये झळकावले. सेहवाग २२ चेंडूंमध्ये ५५ धावा काढून बाद झाला.
वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. सचिन व सेहवाग यांनी केवळ ८ षटकांमध्ये ८५ धावांची भागीदारी करीत ब्लास्टर्सला चांगली सुरुवात करून दिली. या चांगल्या सुरुवातीचा ब्लास्टर्सच्या अन्य स्टार खेळाडूंना लाभ घेता आला नाही. ब्लास्टर्स संघाला निर्धारित २० षटकांत ८ बाद १४० धावांची मजल मारता आली. प्रत्युत्तरात खेळताना वॉरियर्सने पॉन्टिंग व संगकारा यांच्या खेळीच्या जोरावर विजयासाठी आवश्यक धावा १७.२ षटकांतच पूर्ण केल्या. अमेरिकेमध्ये क्रिकेटचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तेंडुलकर व वॉर्न यांच्या पहिल्या प्रयत्नाला चांगले यश मिळाले. (वृत्तसंस्था)
आॅल स्टार्स क्रिकेटचा उद्देश जास्तीत जास्त देशांमध्ये क्रिकेटचा प्रचार व प्रसार करण्याचा आहे. येथे आम्हाला चांगला प्रतिसाद लाभला.’’ वॉर्न म्हणाला, ‘‘माझ्या मते येथील माहोल शानदार होता.
- सचिन तेंडुलकर