शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

अनिर्णीत कसोटीत वॉर्नरचे शतक

By admin | Updated: January 8, 2016 03:32 IST

पावसाच्या व्यत्ययाने गाजलेल्या आॅस्ट्रेलिया-वेस्ट इंडीज यांच्यात गुरुवारी अनिर्णीत अवस्थेत संपलेल्या तिसऱ्या कसोटीत डेव्हिड वॉर्नरच्या शतकाने प्राण फुंकले

सिडनी : पावसाच्या व्यत्ययाने गाजलेल्या आॅस्ट्रेलिया-वेस्ट इंडीज यांच्यात गुरुवारी अनिर्णीत अवस्थेत संपलेल्या तिसऱ्या कसोटीत डेव्हिड वॉर्नरच्या शतकाने प्राण फुंकले. या सामन्यात पावसामुळे अनेक तासांचा खेळ वाया गेला. अखेरच्या दिवशी ८२ षटकांचा खेळ झाला. त्यात वॉर्नरने १६वे कसोटी शतक झळकावून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. होबार्ड आणि मेलबोर्न कसोटी जिंकून मालिका आधीच २-०ने जिंकली हे विशेष.याआधीच्या दोन कसोटींत वॉर्नरच्या सर्वोच्च धावा होत्या ६४. दुसरीकडे, सहकाऱ्यांनी मात्र या दोन्ही सामन्यांत ६ शतके ठोकली होती. स्थानिक वेळेनुसार ४ वाजून ५० मिनिटांनी सामना थांबविण्यात आला तेव्हा वॉर्नर नाबाद १२२, तर पीटर नेव्हिल ७ धावांवर नाबाद होते. विंडीजने पहिल्या डावात केलेल्या ३३० धावांच्या मोबदल्यात आॅस्ट्रेलियाने २ बाद १७६पर्यंत मजल गाठताच सामना ड्रॉ घोषित झाला. उपाहाराआधी विंडीजचा डाव संपला. नाथन लियॉन व स्टीव्ह ओकिफे यांनी आॅस्ट्रेलियाकडून प्रत्येकी ३ गडी बाद केले. विंडीजकडून दिनेश रामदीन याने सर्वाधिक ६२ धावांचे योगदान दिले. मालिकावीराला रिची बेनो मेडल!सध्या सुरू असलेल्या मालिकेत मालिकावीर पुरस्कारविजेत्याला ‘प्लेअर आॅफ द सिरीज’ म्हणून महान खेळाडू रिची बेनो यांच्या नावाने मेडल प्रदान केले जाणार आहे. लेग स्पिनर राहिलेले बेनो आॅस्ट्रेलियाचे कर्णधार होते. नंतर समालोचक म्हणून त्यांनी क्रिकेटचा प्रसार केला. त्यांच्या कुटुंबीयांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. (वृत्तसंस्था)