वॉर्नरची फटकेबाजी, हैदराबादचा गुजरातवर 9 गडी राखून विजय

By Admin | Updated: April 9, 2017 20:05 IST2017-04-09T19:37:57+5:302017-04-09T20:05:53+5:30

सनरायझर्स हैदराबादने गुजरात लायन्सचा 9 विकेटने पराभव करत सलग दुस-या विजयाची नोंद केली.

Warner smacked, Hyderabad beat Gujarat by 9 wickets | वॉर्नरची फटकेबाजी, हैदराबादचा गुजरातवर 9 गडी राखून विजय

वॉर्नरची फटकेबाजी, हैदराबादचा गुजरातवर 9 गडी राखून विजय

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 9 -सनरायझर्स हैदराबादने गुजरात लायन्सचा  9 विकेटने पराभव करत आयपीएलमधील सलग दुस-या  विजयाची नोंद केली. गुजरात लायन्सने दिलेल्या  136 धावांच्या माफक आव्हानाचा हैदराबाद संघाने कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या खेळीच्या बळावर सहज पाठलाग केला.डेव्हिड वॉर्नर आणि मोईसेस हेनरिक्स यांनी तिस-या विकेटसाठी अभेद्य भागीदारी रचली. दोघांनीही अर्धशतक साजरं केलं. वॉर्नरने 6 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 45 चेंडूक 76 धावा ठोकल्या. तर हेनरिक्सने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. शिखर धवनच्या रूपात त्यांचा केवळ एक गडी बाद झाला. मात्र वॉर्नरने फटेबाजी करत विजय सोपा केला. यासोबत गुजरात लायन्सला त्यांच्या आयपीएलमधील दुसऱ्या सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला. 
 
यापुर्वी नाणेफेक जिंकत हैदराबादने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातच्या सलामीच्या जोडीने पहिल्या दोन षट्कांत चांगली फटकेबाजी केली. राशीदने पाचव्या ओव्हरमध्ये ब्रँडन मॅक्कुलमला पायचित करून ही जोडी फोडली.  सहाव्या ओव्हरमध्ये भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर धवनने जेसर रॉयचा उत्कृष्ट झेल घेत त्याला बाद केले. कर्णधार रैनाचा संयमी खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण राशिदने रैनाला बाद करत सामन्यातील तिसरा बळी घेतला. त्यानंतर आलेल्या  दिनेश कार्तिक आणि ड्वेन स्मिथ यांनी संयमी फलंदाजी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, 17 व्या षटकात स्मिथ भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर 18 व्या षटकात कार्तिक चुकीचा फटका मारताना झेलबाद झाला. त्यानंतर धवल कुलकर्णीही आल्या पावली परतला.
 
गुजरातकडून जेसन रॉय (31), दिनेश कार्तिक (30) आणि ड्वेन स्मिथ (37) यांनाच मोठी खेळी करता आली. तर हैदराबादकडून गोलंदाज रशिद खान याने 3, तर भुवनेश्वर कुमारने 2 विकेट्स घेतल्या. आशिष नेहराने एका फलंदाजाला माघारी धाडलं.
 

 

 

Web Title: Warner smacked, Hyderabad beat Gujarat by 9 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.