भारताविरुद्ध वॉर्नर-मार्श यांनी सलामीला यावे : स्टीव्ह वॉ

By Admin | Updated: February 10, 2017 02:14 IST2017-02-10T02:14:46+5:302017-02-10T02:14:46+5:30

भारताविरुद्ध २३ फेब्रुवारीपासून पुण्यात सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेसाठी आॅस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर-शॉन मार्श यांना सलामीला उतरवावे, अशी सूचना माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने केली

Warner-Marsh should open with India: Steve Waugh | भारताविरुद्ध वॉर्नर-मार्श यांनी सलामीला यावे : स्टीव्ह वॉ

भारताविरुद्ध वॉर्नर-मार्श यांनी सलामीला यावे : स्टीव्ह वॉ

मेलबोर्न : भारताविरुद्ध २३ फेब्रुवारीपासून पुण्यात सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेसाठी आॅस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर-शॉन मार्श यांना सलामीला उतरवावे, अशी सूचना माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने केली.
‘‘पाकिस्तानविरुद्ध मॅथ्यू रेनशॉ याने चांगली कामगिरी केली असली, तरी भारतीय उपखंडात ७८च्या सरासरीने धावा ठोकणाऱ्या मार्शला सलामीला खेळविण्यात संघाला लाभ मिळेल, असे मत वॉने व्यक्त केले. मॅथ्यू रेनशॉची आॅस्ट्रेलियातील कामगिरी देखणी होती पण मी शॉन मार्शला खेळताना पाहू इच्छितो. जखमी होण्याआधी तो संघाचा सलामीवीर होता. कसोटी स्तरावर खेळण्यास तो सज्ज आहे. भारतीय उपखंडात फलंदाजी करण्याचा त्याचा अनुभव दांडगा असल्याने आॅस्ट्रेलिया संघाला मोठा लाभ मिळेल.’’ मार्श द. आफ्रिकेविरुद्ध कसोटी खेळताना बोटाला दुखापत होताच बाहेर झाला होता. आता तो संघात परतला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Warner-Marsh should open with India: Steve Waugh