वॉर्नरने पुन्हा बदडले!
By Admin | Updated: December 12, 2014 23:54 IST2014-12-12T23:54:12+5:302014-12-12T23:54:12+5:30
सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने सामन्यातील दुसरे शतक ठोकून यजमानांची ही आघाडी 363 धावांर्पयत पोहोचवली.

वॉर्नरने पुन्हा बदडले!
लिऑनची भेदक गोलंदाजी : भारत सर्व बाद 444; ऑस्ट्रेलियाकडे 363 धावांची आघाडी
अॅडिलेड : लॅथन लिऑनने भारताची फिरकी घेऊन ऑस्ट्रेलियाची 73 धावांची आघाडी निश्चित केल्यानंतर सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने सामन्यातील दुसरे शतक ठोकून यजमानांची ही आघाडी 363 धावांर्पयत पोहोचवली. उसळीला मदत करणा:या खेळपट्टीचा योग्य वापर करून ऑफस्पिनर लिऑनने भारताच्या पाच फलंदाजांना माघारी धाडले. त्यानंतर वॉर्नरने 2क्14मध्ये सलग दोन डावांत शतक ठोकण्याची किमया पुन्हा केली. चौथ्या दिवसाचा खेळ संपला, त्या वेळी यजमानांच्या 5 बाद 29क् धावा झाल्या असून, त्यांच्याकडे 363 धावांची भक्कम आघाडी आहे.
ऑस्ट्रेलियाने या आघाडीवर डाव घोषित केला, तर भारताला अखेरच्या दिवशी अंदाजे 98 षटके खेळण्यास मिळतील आणि या खेळपट्टीवर पूर्ण दिवस खेळून काढणो भारताला तितकेसे सोपे जाणार नाही. यापूर्वी 2क्क्2मध्ये लॉर्ड्स कसोटीत अखेरच्या दिवशी भारताने इतकी षटके खेळून काढण्याची किमया केली होती; परंतु त्यांच्या वाटय़ाला पराभव आला होता. त्यापूर्वी 1997मध्ये कोलंबो आणि 1992मध्ये अॅडिलेड येथे भारतावर असा प्रसंग ओढवला होता. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाची चांगलीच कसोटी लागणार, हे निश्चित.
तिस:या दिवसाच्या 5 बाद 369 धावांवरून चौथ्या दिवसाची सुरुवात करणा:या भारतीय संघाला लिऑनने फिरकीच्या बळावर चांगलेच नाचवले. 32 धावांची भर घालून संघाला चारशेच्या उंबरठय़ावर आणणा:या रोहित शर्माला लिऑनने गोलंदाजीवर स्वत: झेलबाद केले. त्यानंतर आलेला कर्ण शर्माही पिटर सिडलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. वृद्धिमान साहा आणि मोहम्मद शमी यांनी आठव्या विकेटसाठी संघर्ष केला; परंतु लिऑनने साहाला वॉटसनकरवी झेलबाद केले. शमीेने धावांची गती वाढविण्यासाठी फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. ईशांत शर्मा भोपळाही न फोडता लिऑनच्या गोलंदाजीवरच माघारी परतला. 24 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार खेचणा:या मोहम्मद शमीला सिडलने बाद करून भारताचा डाव संपुष्टात आणला. 116. 4 षटकांत भारताने सर्वबाद 444 धावा केल्या होत्या. त्यांना ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी 73 धावा कमी पडल्या.
पहिल्या डावातील 73 धावांची आघाडी आणखी भक्कम करण्यासाठी उतरलेल्या ऑसींनी वन-डे स्टाइल फटकेबाजीस सुरुवात केली. सलामीवीर क्रिस रॉजर्सने कर्ण शर्माच्या फिरकीवर मारलेला स्वीप रोहित शर्माने झेलला आणि ऑसींना 13व्या षटकात पहिला धक्का दिला. मात्र, पहिल्या डावात शतक ठोकणा:या वॉर्नरचा आक्रमक खेळ करण्याचा निर्धार होता. त्याने दमदार फटकेबाजीचा नजराणा पुन्हा सादर करून ऑसींची मोठय़ा आघाडीकडे वाटचाल सुरू ठेवली. त्याला शेन वाटॅसन, स्टीव्हन स्मिथ आणि मिशेल मार्श यांनी उत्तम साथ दिली. 33 धावा करणा:या वॉटसनला शमीने त्रिफळाचीत केले. मायकल क्लार्कला मोठी खेळी करण्यात मात्र या वेळी अपयश आले. पण, वॉर्नर चांगल्याच मुडमध्ये होता. त्याने 1क्2 धावांची खेळी करून संघाला मजबूत स्थितीत आणले.
स्मिथने 64 चेंडूंत 52 धावा चोपल्या, तर मार्शने खास टी-2क् शैलीत 26 चेंडूंत 4 चौकार व तीन षटकार खेचून 4क् धावांची खेळी केली. दिवसअखेर स्मिथ नाबाद 52 धावांवर, तर ब्रॅड हॅडिन नाबाद 14 धावांवर होता. ऑसींनी चौथ्या दिवशी 69 षटकांत 5 बाद 29क् धावा करून 363 धावांची आघाडी निश्चित
केली आहे.(वृत्तसंस्था)
वॉर्नर व अॅरोनची बाचाबाची
पहिल्या कसोटीतील शुक्रवारचा दिवस हा थोडासा गरमागरमीचा होता. वरुण अॅरोनच्या गोलंदाजीवर डेव्हिड वॉर्नर त्रिफळाचीत झाला होता; परंतु पंचांना तो नोबॉल असल्याचे समजताच त्यांनी वॉर्नरला पुन्हा माघारी बोलावले. त्या वेळी अॅरोन आणि वॉर्नर यांच्यात बाचाबाची झाली. 34व्या षटकाच्या दुस:या चेंडूवर अॅरोनने वॉर्नरला त्रिफळाचीत केले आणि त्या वेळी तो 66 धावांवर होता. पंचांनी मात्र तो नोबॉल दिला आणि वॉर्नरला जीवदान मिळाले. वॉर्नरचे मैदानाच्या मधोमध येऊन आनंद साजरा करताना अॅरोनला एक टक पाहिले. त्यानंतर वॉर्नर, अॅरोन, शेन वॉटसन आणि शिखर धवन यांच्यात वादावादी सुरू झाली. पंचांच्या मध्यस्थीनंतर हा वाद निवळला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया - पहिला डाव 7 बाद 517 धावांवर घोषित.
भारत : मुरली विजय झे. हॅडिन गो. जॉन्सन 53, शिखर धवन त्रि. गो. हॅरिस 25, चेतेश्वर पुजारा त्रि. गो. लिऑन 73, विराट कोहली झे. हॅरिस गो. जॉन्सन 115, अजिंक्य रहाणो झे. वॉटसन 62, रोहित शर्मा झे. व गो. लिऑन 43, वृद्धिमान साहा झे. वॉटसन गो. लिऑन 25, कर्ण शर्मा त्रि. गो. सिडल 4, मोहम्मद शमी झे. वॉटसन गो. सिडल 34, ईशांत शर्मा झे. स्मिथ गो. लिऑन क्, वरुण अॅरॉन नाबाद 3. अवांतर - 7; एकूण 116.4 षटकांत सर्व बाद 444 धावा.
गोलंदाजी - जॉन्सन 22-6-1क्2-2, हॅरिस 21-6-55-1, लिऑन 36-4-134-5, सिडल 18.4-2-88-2.
ऑस्ट्रेलिया - दुसरा डाव
रॉजर्स गो. शमी गो. कर्ण शर्मा 21, वॉर्नर गो. कर्ण 1क्2, वॉटसन त्रि. गो. शमी 33, क्लार्क झे. साहा गो. अॅरोन 7, स्मिथ नाबाद 52, मार्श गो. विजय गो. रोहित 4क्, हॅडिन नाबाद 14. अवांतर - 21; एकूण - 69 षटकांत 5 बाद 29क् धावा.
गोलंदाजी - शमी 11-2-42-1, ईशांत 14-3-41-क्, कर्ण 16-2-95-2, रोहित 12-2-35-1, अॅरोन 1क्-क्-43-1.
‘संयम’ हाच
मूलमंत्र : रहाणो
अॅडिलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अखेरच्या दिवशी मोठय़ा लक्ष्याचा पाठलाग करताना ‘संयम’ हाच मूलमंत्र अवलंबण्याचा निर्धार भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणो याने व्यक्त केला आहे. तो म्हणाला, अखेरच्या दिवशी यशस्वी व्हायचे असल्यास संयमी खेळ करण्याची आवश्यकता आहे. चांगल्या सुरुवातीनंतर हीच लय कायम राखण्याची आवश्यकता आहे आणि ती मानसिक कणखरतेची परीक्षा असेल. आमचे सर्व फलंदाज यात सक्षम आहेत आणि आशा करतो, की चांगली कामगिरी करण्यात ते यशस्वी होतील.
गावसकर, पाँटिंगच्या क्लबमध्ये वॉर्नर
अॅडिलेड : डेव्हिड वॉर्नरने 2क्14मध्ये दुस:यांदा एकाच कसोटीत दोन शतके झळकावण्याची किमया केली. अशी कामगिरी करणारा तो पाचवा फलंदाज ठरला असून, तो सुनील गावसरकर आणि रिकी पाँटिंग यांच्या क्लबमध्ये समाविष्ट झाला आहे.
वॉर्नरने भारताविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 145 धावा आणि दुस:या डावात 1क्2 धावा केल्या. या आधी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटीत मार्चमध्ये 135 व 145 धावांची खेळी केली होती. वॉर्नरआधी वेस्ट इंडीजच्या क्लाईड वॉलकॉटने 1955मध्ये, भारताच्या सुनील गावसकर यांनी 1978मध्ये, o्रीलंकेच्या अरविंद डिसिल्वाने 1997मध्ये आणि ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगने 2क्क्6मध्ये एका वर्षात दोन वेळा दोन कसोटीच्या दोन्ही डावांत शतक ठोकले होते.
भारताविरुद्ध दोन डावांत शतके झळकावणारा वॉर्नर हा दुसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. याआधी सर डॉन ब्रॅडमन यांनी 1948मध्ये मेलबर्न कसोटीत 132 व नाबाद 127 धावा केल्या होत्या. वॉर्नरने शुक्रवारी अकरावे आणि भारताविरुद्ध तिसरे शतक झळकावले. या वर्षी त्याने सहा शतके ठोकली आहेत. एका वर्षात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम पाँटिंगच्या नावावर असून, त्याने 2क्क्6मध्ये सात शतके केली होती. मॅथ्यू हेडनने 2क्क्2मध्ये सहा आणि पाँटिंगने 2क्क्3मध्ये सहा शतके करण्याची किमया केली होती. एका वर्षात सर्वाधिक नऊ शतके ठोकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफच्या नावावर आहे.
10 विकेट्स घेण्याचा प्रयत्न असेल - वॉर्नर
खेळपट्टी सपाट नसून अखेरच्या दिवशी दहा विकेट्स घेण्याचा आमचा प्रय} असेल, असे मत व्यक्त केले आहे ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने. तो म्हणाला, या खेळपट्टीवर धावा बनविणो आता कठीण झाले असून, चेंडूही जुना झाला आहे. नॅथन लिऑन अशा परिस्थितीचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रय} करेल. खेळपट्टी बदलली आहे आणि 98 षटके शिल्लक आहेत. आमच्याकडे 1क् विकेट्स घेण्याच्या दहा संधी आहेत.