जंग रेसिफे : फुटबॉल स्पर्धेत ‘क’ गटात शनिवारी आयवरी कोस्ट संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीच्या निमित्ताने जपान संघ वर्चस्व गाजवण्यास उत्सुक आहे. मिडफिल्डर याया टुरेच्या अनुपस्थिचा लाभ घेण्यास जपान संघ प्रयत्नशील राहील.आयवरी कोस्ट संघाला अमेरिकेत खेळलेल्या सराव सामन्यांत बोस्नियाविरुद्ध १-२ पराभव स्वीकारावा लागला होता तर अल सल्वाडोरविरुद्ध त्यांनी विजय मिळविला होता. आफ्रिकन संघासाठी जपानविरुद्धची लढत अधिक महत्त्वाची आहे. आयवरी कोस्ट व जपान संघांदरम्यान यापूर्वी तीनदा लढत झालेली आहे. त्यात जपानने दोनदा विजय मिळविला तर आयवरी कोस्ट संघाला केवळ एकदा विजय मिळविता आला. जून २०१० मध्ये उभय संघांदरम्यान अखेरीच लढत झाली होती. त्यात आयवरी कोस्ट संघाने २-० ने सहज विजय मिळविला होता. आफ्रिकन संघ तिसऱ्यांदा विश्वकप स्पर्धेत प्रतिनिधित्व करीत असून यावेळी त्यांना बाद फेरी गाठण्याची आशा आहे. याउलट जपान संघाने गेल्या चार फायनल्समध्ये दोनदा अंतिम १६ संघांमध्ये स्थान मिळविलेले आहे. आयवरी कोस्ट संघ जगातील दुसरे सर्वांत कमी वय असलेले प्रशिक्षक साबरी लंबूची यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत असून धक्कादायक निकाल नोंदविण्यास उत्सुक आहे. या संघात क्लब फुटबॉल खेळणारा गोलकिपर सिलवेन बोहहुओ याचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
वर्चस्वाची लढाई !
By admin | Updated: June 14, 2014 04:17 IST