वकारला राजीनामा द्यायला हवे: लतिफ
By Admin | Updated: April 24, 2015 00:55 IST2015-04-24T00:55:11+5:302015-04-24T00:55:11+5:30
कराची: राष्ट्रीय संघाच्या बांगलादेशकडून 0-3 च्या लाजिरवाण्या पराभवानंतर मुख्य कोच वकार युनिस याने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतिफ याने केली आह़े लतिफ म्हणाला, मला वाटते की या लाजिरवाण्या प्रदर्शनानंतर वकारने स्वत:हूनच आपले पद सोडायला हव़े त्याने स्वत:हूनच पायउतार व्हावे हे त्याच्यासाठी चांगलेच आह़े बांगलादेशने खूप सुधारणा केली असली तरी अशाप्रकारे सामना गमावणे हे असहनीय आह़े यासाठी संघ व्यवस्थापनच जबाबदार आह़े ते तिन्ही सामन्यांमध्ये योग्य संघदेखील उतरवू शकले नाहीत़ माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने म्हटले की, संघाला कसोटी मालिकेमध्येदेखील कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे, आम्ही वन-डे मालिका गमावली आणि मला वाटते की आता कसोटी सामन्याचे परिणामदेखील असेच येतील्

वकारला राजीनामा द्यायला हवे: लतिफ
क ाची: राष्ट्रीय संघाच्या बांगलादेशकडून 0-3 च्या लाजिरवाण्या पराभवानंतर मुख्य कोच वकार युनिस याने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतिफ याने केली आह़े लतिफ म्हणाला, मला वाटते की या लाजिरवाण्या प्रदर्शनानंतर वकारने स्वत:हूनच आपले पद सोडायला हव़े त्याने स्वत:हूनच पायउतार व्हावे हे त्याच्यासाठी चांगलेच आह़े बांगलादेशने खूप सुधारणा केली असली तरी अशाप्रकारे सामना गमावणे हे असहनीय आह़े यासाठी संघ व्यवस्थापनच जबाबदार आह़े ते तिन्ही सामन्यांमध्ये योग्य संघदेखील उतरवू शकले नाहीत़ माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने म्हटले की, संघाला कसोटी मालिकेमध्येदेखील कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे, आम्ही वन-डे मालिका गमावली आणि मला वाटते की आता कसोटी सामन्याचे परिणामदेखील असेच येतील़