वकारने फेटाळले फिक्सिंगचे आरोप

By Admin | Updated: November 22, 2015 03:59 IST2015-11-22T03:59:39+5:302015-11-22T03:59:39+5:30

इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यांत ६ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पाक संघावर मॅच फिक्सिंगचे आरोप करण्यात आले. पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक वकार

Waqar rejects fixing allegations | वकारने फेटाळले फिक्सिंगचे आरोप

वकारने फेटाळले फिक्सिंगचे आरोप

दुबई : इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यांत ६ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पाक संघावर मॅच फिक्सिंगचे आरोप करण्यात आले. पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक वकार युनूस यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले.
वकार म्हणाले, ‘मला या आरोपाची माहिती नव्हती. याचे वृत्त मला काही वेळानंतर कळले. मला पाकिस्तान संघ व खेळाडूंवर पूर्ण विश्वास आहे. सामन्यामध्ये काहीच चुकीचे नव्हते. जय-पराजय हा खेळाचा एक भाग आहे, पण त्यानंतर घडणाऱ्या बाबी निराशाजनक आहे. मी खेळाडूंबाबत समाधानी आहे.’
ब्रिटनमधील एका वृत्तपत्राने तिसऱ्या लढतीत पाकिस्तानच्या पराभवानंतर संघातील खेळाडूंवर फिक्सिंगचा संशय व्यक्त करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) भ्रष्टाचार विरोधी समितीने पाक संघाच्या अनियमित फलंदाजी क्रमाबाबत चौकशी सुरू केली असल्याचे वृत्त प्रकाशित केले.
तीन धावबाद आणि फलंदाज चुकीचा फटका खेळून बाद होणे आणि निराशाजनक क्षेत्ररक्षण या बाबी संशय व्यक्त करण्यास पुरेशा आहेत. पाटा खेळपट्टीवर पाकिस्तान संघाचा डाव २०८ धावांत संपुष्टात आला. कर्णधार अजहर अली, शोएब मलिक आणि मोहम्मद रिजवान धावबाद झाले होते. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना एकवेळ ४ बाद ९४ अशा निराशाजनक स्थितीत असलेल्या इंग्लंड संघाने या लढतीत ६ गडी राखून विजय मिळविला. (वृत्तसंस्था)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) शहरयार खान यांनी वॉनच्या टिष्ट्वटवर टीका करताना म्हटले की, ‘क्रिकेटवर संशय व्यक्त करणाऱ्याची मला चीड येते. वॉनने चुकीचे वक्तव्य केले. त्याच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. आम्ही हे प्रकरण आयसीसीपुढे मांडणार आहोत.’

फिक्सिंगबाबत पाकिस्ताचा इतिहास खराब आहे. वर्ष २००० मध्ये माजी कर्णधार सलीम मलिकवर आजीवन बंदी घालण्यात आली. आॅस्ट्रेलियाचे शेन वॉर्न, मार्क वॉ आणि टीम मे यांनी १९९५ च्या दौऱ्यात त्याच्यावर लाच देण्याचा प्रस्ताव ठेवल्याचा आरोप केला होता. चौकशीनंतर वकार युनूस, वसीम अक्रम आणि मुश्ताक अहमद यांच्यावर दंड ठोठावण्यात आला.

Web Title: Waqar rejects fixing allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.