विंडीजमध्ये विजयी पताका फडकणार!
By Admin | Updated: July 21, 2016 05:59 IST2016-07-21T05:59:53+5:302016-07-21T05:59:53+5:30
भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध उद्या गुरुवारपासून सुरू होत असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विजयी आघाडी मिळविण्याच्या इराद्याने उतरणार

विंडीजमध्ये विजयी पताका फडकणार!
अँटिग्वा : नवे कोच अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनात आत्मविश्वासाचा संचार झालेला भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध उद्या गुरुवारपासून सुरू होत असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विजयी आघाडी मिळविण्याच्या इराद्याने उतरणार आहे. कॅरेबियन भूमीत सलग तिसरी मालिका जिंकण्याचे संघाचे उद्दिष्ट आहे.
कुंबळेच्या मार्गदर्शनात संघ प्रथमच खेळणार आहे. शिबिरानंतर दोन सराव सामने त्यांच्याच मार्गदर्शनात झाले. या काळात त्यांनी सांघिक कामगिरीवर भर दिला आहे. आता मैदानावर खेळाडूंना कोचचे डावपेच यशस्वी ठरविण्याची वेळ आली आहे. कर्णधार विराट कोहली कॅरेबियन भूमीत मालिका विजयाची हॅट्ट्रिक नोंदविण्यास उत्सुक आहे. २००७ मध्ये राहुल द्रविड आणि २०११ मध्ये धोनीच्या नेतृत्वात भारत मालिका जिंकला होता. कोहलीच्या नेतृत्वात भारताने गतवर्षी लंकेला २-१ ने आणि द. आफ्रिकेला ३-० ने पराभूत केले होते.
खेळपट्टीवर गवत असले तरी पाच दिवसांत खेळपट्टीला भेगा जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशा वेळी भारतीय संघात पाच गोलंदाज असतील. स्टुअर्ट बिन्नीऐवजी अमित मिश्राला संधी दिली जाईल. ईशांत शर्माचा जोडीदार म्हणून मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. पाच गोलंदाज उतरविण्याचा अर्थ रोहित शर्माला पुन्हा राखीव बाकावर बसावे लागेल. दोन दिवसांआधी झालेल्या ऐच्छिक सरावात मात्र तो सहभागी झाला होता. त्याच्याशिवाय बिन्नी, मिश्रा, चेतेश्वर पुजारा आणि के. एल. राहुल यांनी सराव केला. तिसऱ्या स्थानावर राहुल की पुजारा हा देखील उत्सुकतेचा विषय आहे. राहुल उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून, त्याने दोन्ही सराव सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती. दुसरीकडे विंडीजकडे डेरेन ब्राव्हो आणि मर्लोन सॅम्युअल्स हे अनुभवी खेळाडू आहेत. कर्णधार जेसन होल्डर याला दोघांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अन्य फलंदाजांना तितकासा अनुभव नाही. देवेंद्र बिशू हा एकमेव फिरकीपटू संघात आहे. वेगवान माऱ्यासाठी शेनोन गॅब्रियल, मिगूल कमिन्स, कार्लोस ब्रेथवेट व स्वत: होल्डर असा चांगला पर्याय उपलब्ध आहे.
>अँटिग्वा : नवे कोच अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनात आत्मविश्वासाचा संचार झालेला भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध उद्या गुरुवारपासून सुरू होत असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विजयी आघाडी मिळविण्याच्या इराद्याने उतरणार आहे. कॅरेबियन भूमीत सलग तिसरी मालिका जिंकण्याचे संघाचे उद्दिष्ट आहे.
कुंबळेच्या मार्गदर्शनात संघ प्रथमच खेळणार आहे. शिबिरानंतर दोन सराव सामने त्यांच्याच मार्गदर्शनात झाले. या काळात त्यांनी सांघिक कामगिरीवर भर दिला आहे. आता मैदानावर खेळाडूंना कोचचे डावपेच यशस्वी ठरविण्याची वेळ आली आहे. कर्णधार विराट कोहली कॅरेबियन भूमीत मालिका विजयाची हॅट्ट्रिक नोंदविण्यास उत्सुक आहे. २००७ मध्ये राहुल द्रविड आणि २०११ मध्ये धोनीच्या नेतृत्वात भारत मालिका जिंकला होता. कोहलीच्या नेतृत्वात भारताने गतवर्षी लंकेला २-१ ने आणि द. आफ्रिकेला ३-० ने पराभूत केले होते.
खेळपट्टीवर गवत असले तरी पाच दिवसांत खेळपट्टीला भेगा जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशा वेळी भारतीय संघात पाच गोलंदाज असतील. स्टुअर्ट बिन्नीऐवजी अमित मिश्राला संधी दिली जाईल. ईशांत शर्माचा जोडीदार म्हणून मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. पाच गोलंदाज उतरविण्याचा अर्थ रोहित शर्माला पुन्हा राखीव बाकावर बसावे लागेल. दोन दिवसांआधी झालेल्या ऐच्छिक सरावात मात्र तो सहभागी झाला होता. त्याच्याशिवाय बिन्नी, मिश्रा, चेतेश्वर पुजारा आणि के. एल. राहुल यांनी सराव केला. तिसऱ्या स्थानावर राहुल की पुजारा हा देखील उत्सुकतेचा विषय आहे. राहुल उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून, त्याने दोन्ही सराव सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती. दुसरीकडे विंडीजकडे डेरेन ब्राव्हो आणि मर्लोन सॅम्युअल्स हे अनुभवी खेळाडू आहेत. कर्णधार जेसन होल्डर याला दोघांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अन्य फलंदाजांना तितकासा अनुभव नाही. देवेंद्र बिशू हा एकमेव फिरकीपटू संघात आहे. वेगवान माऱ्यासाठी शेनोन गॅब्रियल, मिगूल कमिन्स, कार्लोस ब्रेथवेट व स्वत: होल्डर असा चांगला पर्याय उपलब्ध आहे.
>फिरकी गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावतील
वेस्ट इंडीजविरुद्ध उद्यापासून (गुरुवार) सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात फिरकी गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावतील. विंडीजमध्ये खेळपट्टी संथ असेल, पण त्याबद्दल काही सांगता येणार नाही. एक चांगली बाब आहे, की आता भारताकडे ८ ते १० चांगल्या वेगवान गोलंदाजांचा संच आहे. सध्या संघाकडे स्विंग करणारे गोलंदाजसुद्धा आहेत. याचबरोबर कोणत्याही प्रारूपात गोलंदाजी करू शकतील, असे गोलंदाज आहेत. या मालिकेबाबात उत्सुकता आहे. माझे नक्की लक्ष असेल.
- महेंद्रसिंह धोनी, वनडे कर्णधार
>खेळपट्टीमुळे विचलित नाही : संजय बांगर
अँटिग्वाच्या खेळपट्टीवर थोडे गवत असले, तरी त्यामुळे विचलित झालो नाही. आमचे खेळाडू मंद आणि ‘लाइव्ह’ अशा दोन्ही प्रकारच्या खेळपट्ट्यांसाठी सज्ज असल्याचे फलंदाजी कोच संजय बांगर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘खेळ पुढे सरकला की खेळपट्टी मंद होत जाते, हे ध्यानात ठेवून तयारी करीत आहोत. संघ व्यवस्थापनाच्या बैठकीत डावपेचांवर चर्चा झाली. खेळाडूंनी आता मैदानात डावपेच अमलात आणावेत. खेळपट्टी कशीही असो आपण योग्य चेंडू टाकला, तर विकेट मिळेलच. गोलंदाजांनी विकेट घेणारे चेंडू टाकावेत, यावर मी भर देतो. त्यादृष्टीने मी गोलंदाजांना काही टिप्स दिल्या आहेत.’
>उभय संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिद्धिमान साहा, आर. आश्विन, अमित मिश्रा, रवींद्र जडेजा, स्टुअर्ट बिन्नी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर, उमेश यादव आणि ईशांत शर्मा.वेस्ट इंडीज : जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, राजेंद्र चंद्रिका, डेरेन ब्राव्हो, मर्लोन सॅम्युअल्स, जर्मेन ब्लॅकवूड, रोस्टन चेस, लियोन जॉन्सन, शेन डारिच, देवेंद्र बिशू, कार्लोस ब्रेथवेट, शेनोन गॅब्रियल व मिगुल कमिन्स.