बावणे कुणबी
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:35+5:302015-02-11T00:33:35+5:30
बावणे कुणबी समाज सामूहिक विवाह सोहळा कार्यालयाचे उद्घाटन

बावणे कुणबी
ब वणे कुणबी समाज सामूहिक विवाह सोहळा कार्यालयाचे उद्घाटन(फोटो ओळी : बावणे कुणबी समाज सामूहिक विवाह सोहळा संयोजन समितीचे सदस्य मान्यवरांसह.)नागपूर : बावणे कुणबी समाजाच्यावतीने २२ व्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन अक्षयतृतीयेच्या शुभ पर्वावर दिनांक २१ एप्रिल २०१५ रोजी करण्यात आले आहे, सामूहिक विवाह सोहळा कार्यालयाचे उद्घाटन रामनगर येथील समाज भवनमध्ये आयोजित समारंभात जयवंत टिचकुले यांच्या हस्ते झाले. सुरुवातीला राजेंद्र भुते यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. १९९३ पासून सुरू झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात आजतागायत ३१४ विवाह संपन्न झालेले आहेत. सामूहिक विवाह सोहळ्याकरिता संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून संयोजकपदी देवेंद्र भुते व सहसंयोजक म्हणून विलास सेलोकर यांची निवड करण्यात आली. सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांना समाजातर्फे संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि नववधू-वरांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल. सामूहिक विवाह कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. विलास रेहपाडे, ॲड. जी.डी. वैद्य, मदन शेंडे, हरिभाऊ बांते, सुनील कुकडे, दामोधर चामट, भोजराज बांते, किशोर कानतोडे, शेषराव सार्वे, सुनील राघोर्ते, विष्णु भुते, प्रदीप बुरडे, चंद्रकांत हिंगे, के.टी. मते, श्रीधर बुरडे, ममता भोयर, सुधा वहले, सुनंदा चामट, डॉ.माधवी रेहपाडे, विभा भोतमांगे, मोनिका राघोर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन बावणे कुणबी समाज सचिव बाबा तुमसरे यांनी केले तर मुधकर राखडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)