वॉल्श यांचा राजीनामा
By Admin | Updated: November 19, 2014 04:14 IST2014-11-19T04:14:31+5:302014-11-19T04:14:31+5:30
आर्थिक घोटाळ्याचे आरोप आणि दुसऱ्या कार्यकाळाबाबतच्या साशंकतेला पूर्णविराम देताना भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

वॉल्श यांचा राजीनामा
नवी दिल्ली : हॉकी इंडियाचे अध्यक्ष (एचआय) नरेंद्र बत्रा यांनी केलेले आर्थिक घोटाळ्याचे आरोप आणि दुसऱ्या कार्यकाळाबाबतच्या साशंकतेला पूर्णविराम देताना भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. वॉल्श यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय हॉकी संघाने प्रदीर्घ कालावधीनंतर आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाचा मान मिळविला.
भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी वॉल्श एक वर्ष होते. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचीही (साई) आॅस्ट्रेलियन खेळाडूला राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा कायम राखण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे बत्राचे आरोप आणि हॉकी प्रशासनाच्या भूमिकेमुळे नाराज असलेल्या वॉल्श यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.
यापूर्वी १९ आॅक्टोबर रोजी वॉल्श यांनी भारतीय हॉकीमध्ये प्रशासकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप करीत प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी वॉल्श म्हणाले होते, ‘खराब प्रशासकीय व्यवस्थेमुळे पारदर्शीपणे कार्य करणे शक्य नाही.