वेल्स - बेल्जिअमची पहिल्या हाफमध्ये बरोबरी

By Admin | Updated: July 2, 2016 01:49 IST2016-07-02T01:49:55+5:302016-07-02T01:49:55+5:30

युरो चषकाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात वेल्स आणि बेल्जिअम यांनी पहिल्या हाफमध्ये बरोबरी साधली.

Wales - Equal with the first half of Belgium | वेल्स - बेल्जिअमची पहिल्या हाफमध्ये बरोबरी

वेल्स - बेल्जिअमची पहिल्या हाफमध्ये बरोबरी

ऑनलाइन लोकमत,
मेट्रोपोली, फ्रान्स, दि. 2-  युरो चषकाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात वेल्स आणि बेल्जिअम यांनी पहिल्या हाफमध्ये बरोबरी साधली. पहिला गोल बेल्जिअमच्या नॅनगॅलोन याने १३ व्या मिनिटालाच केला. त्यानंतर वेल्सचा कर्णधार अ‍ॅशले विल्यम्स याने ३१ व्या मिनिटाला गोल करत संघाला बरोबरी साधून दिली.
बेल्जिअमच्या नॅनगॅलोन याने १३ व्या मिनिटाला २५ मीटर अंतरावरून गोल केला. नॅनगॅलोन याने अप्रतिम फुटवर्कचे प्रदर्शन केले. बेल्जिअमने घेतलेल्या आघाडीला उत्तर देण्याचा प्रयत्न सातत्याने वेल्सकडून होत होता. त्यांनी १० वेळा गोलपोस्टवर जोरदार आक्रमण केले. मात्र ३१ व्या मिनिटाला वेल्सच्या रॅमसेच्या कॉर्नरला विल्यम्सने हेडर मारून गोल केला. ही बरोबरी पहिल्या हाफ संपेपर्यंत कायम राहिली.

Web Title: Wales - Equal with the first half of Belgium