वाका येथे होणार नाही आंतरराष्ट्रीय सामना
By Admin | Updated: September 3, 2015 22:44 IST2015-09-03T22:44:13+5:302015-09-03T22:44:13+5:30
आॅस्ट्रेलियाच्या प्रतिष्ठित वाका क्रिकेट स्टेडियममध्ये प्रमुख आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले जाणार नाहीत. त्यामुळे २0१८-१९ मध्ये इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध

वाका येथे होणार नाही आंतरराष्ट्रीय सामना
सिडनी : आॅस्ट्रेलियाच्या प्रतिष्ठित वाका क्रिकेट स्टेडियममध्ये प्रमुख आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले जाणार नाहीत. त्यामुळे २0१८-१९ मध्ये इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या प्रमुख लढती आता येथे होणार नाहीत.
पश्चिम आॅस्ट्रेलिया क्रिकेट संघ (वाका) यांनी गुरुवारी दिलेल्या एका निवेदनात ही माहिती दिली.
पर्थ येथे नवीन स्टेडियममध्ये ते सामने आयोजित केले जातील. वाका स्टेडियमवर फक्त देशांतर्गत सामने आयोजित होतील. ज्यामुळे कमी संख्येत प्रेक्षक येथे पोहोचतील. वाका स्टेडियमवर देशांतर्गत शेफिल्ड शिल्ड आणि देशांतर्गत मर्यादित षटकांचे सामने आयोजित केले जाणार आहेत; परंतु बिग बॅश ट्वेंटी-२0 लीगचे सामने बर्सवुडस्थित पर्थ स्टेडियमवर स्थानांतरित केले जातील. हे स्टेडियम २0१८ पर्यंत तयार होईल. अशा परिस्थितीत २0१७-१८ मध्ये होणारी अॅशेज कसोटी वाका येथे अखेरची अॅशेज कसोटी असेल. १९७0 मध्ये वाका येथे कसोटी क्रिकेट सामन्याची सुरुवात झाली होती. येथे आॅस्ट्रेलियन संघाने ४१ कसोटी सामने खेळले असून त्यात २४ सामने जिंकले आहेत.