हॉकी संघाला ‘साई’च्या ‘ग्रीन सिग्नल’ची प्रतीक्षा
By Admin | Updated: September 6, 2014 01:43 IST2014-09-06T01:43:12+5:302014-09-06T01:43:12+5:30
मलेशियातील जोहोर चषक हॉकी स्पर्धेसाठी गतविजेत्या भारतीय ज्युनियर हॉकी संघाला भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे.

हॉकी संघाला ‘साई’च्या ‘ग्रीन सिग्नल’ची प्रतीक्षा
नवी दिल्ली : मलेशियातील जोहोर चषक हॉकी स्पर्धेसाठी गतविजेत्या भारतीय ज्युनियर हॉकी संघाला भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. हॉकी इंडियाला साईने अद्याप हिरवी ङोंडी दिलेली नाही. पुढील महिन्यात 1क् ते 18 ऑक्टोबर या कालावधीत जोहोर बाहरु येथे स्पर्धेचे आयोजन होत आहे.
हॉकी इंडियाचे महासचिव नरिंदर बत्र म्हणाले, ‘संघ या स्पर्धेत सहभागी झाला नाही तर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ आमच्यावर मोठा दंड आकारू शकतो. आम्ही 14 ऑगस्ट रोजी सर्व आवश्यक दस्तावेजांसह ‘साई’कडे मंजुरी मागितली आहे. वारंवार स्मरणपत्र देऊनही आम्हाला मंजुरी मात्र मिळालेली नाही. भारत या स्पर्धेत गत चॅम्पियन आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी आयोजित ज्युनियर विश्वचषकाच्या तयारीचा एक भाग आहे. भारतासह या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, पाक, न्यूझीलंड आणि मलेशिया संघ सहभागी होत आहेत. ही एफआयएच मान्यताप्राप्त स्पर्धा असल्याने आम्ही संघाची माघार घेतली तर मोठय़ा रकमेचा दंड आकारला जाईल. हा दंड अडीच लाख स्विस फ्रँक इतका असू शकेल.’
‘एफआयएचच्या मान्यताप्राप्त स्पर्धेतून माघार घ्यायची असेल तर 45 दिवस आधी कळवावे लागते. याशिवाय ही स्पर्धा एफआयएचच्या वार्षिक कॅलेंडरमध्ये असल्यामुळे संघ पाठवायचा नसेल तर आम्हाला आधी कळविल्यास यजमान देशाला पर्यायी व्यवस्था करणो सोपे जाईल. हे प्रकरण प्रलंबित ठेवल्यास आणि उशिरा निर्णय कळविल्यास एफआयएचपुढे मान झुकवावी लागेल.
साईचे महासंचालक जीजी थॉमसन यांच्याशी संपर्क केला तेव्हा त्यांनी प्राधान्याने हे प्रकरण सोडवू असे सांगितले. (वृत्तसंस्था)
हॉकी इंडियाचा अर्ज
मी तपासला नाही. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय वेळापत्रकाचा नियमित भाग असेल तर हा प्रश्न प्राधान्याने सोडवू. लवकरच हिरवी ङोंडी मिळेल, अशा उपाययोजना करू.- नरिंदर बत्र