डोक्यावर चेंडू आदळल्याने वोग्ज जखमी

By Admin | Updated: May 2, 2016 22:34 IST2016-05-02T22:34:52+5:302016-05-02T22:34:52+5:30

काऊंटी क्रिकेट सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना आॅस्टे्रलियाचा खेळाडू अ‍ॅडम वोग्स डोक्याला चेंडू लागल्याने जखमी झाला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले

Vogj injured after falling over the head | डोक्यावर चेंडू आदळल्याने वोग्ज जखमी

डोक्यावर चेंडू आदळल्याने वोग्ज जखमी

काउंटी क्रिकेट : रुग्णालयात दाखल
मेलबर्न : काऊंटी क्रिकेट सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना आॅस्टे्रलियाचा खेळाडू अ‍ॅडम वोग्स डोक्याला चेंडू लागल्याने जखमी झाला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
साऊथैम्पटन येथील रॉज बाऊल मैदानात हैम्पशायर विरुद्ध मिडलसेक्स सामन्यादरम्यान ही घटना घडली. या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना डोक्यावर चेंडू आदळल्याने मिडलसेक्सचा कर्णधार असलेला वोग्स जमिनीवर कोसळला. एका क्षेत्ररक्षकाने फेकेलेला चेंडू यष्टीरक्षक जॉन सिंपसनला पकडता आला नाही आणि तो चेंडू थेट वोग्सच्या डोक्यावर आदळला.
याबाबत मिडलसेक्सचे व्यवस्थापक निदर्शक एंगस फ्रेजर यांनी सांगितले की, ‘‘फिजिओ आणि इतर खेळाडूंच्या मदतीने वोग्सला मैदानाबाहेर आणले गेले. वोग्ससाठी ही दु:खद आणि आमच्यासाठी निराशाजनक घटना आहे की, सामन्यात आता तो खेळू शकणार नाही. जखमी झाल्यानंतरही डे्रसिंग रुमध्ये वोग्सच्या वेदना कमी होत नव्हत्या. त्यामुळे आम्ही त्याला रुग्णालयात दाखल केले.’’
दरम्यान, या घटनेकडे क्रिकेट आॅस्टे्रलियाचे बारीक लक्ष आहे. २०१४ साली देशांतर्गत सामन्यादरम्यान ओस्टे्रलियाई क्रिकेटर फिलिप ह्यूजचा फलंदाजीदरम्यान डोक्यावर चेंडू आदळल्याने मृत्यु झाला होता. या अपघातानंतर पुर्ण क्रिकेटविश्व दु:खाच्या सागरात बुडाला होता. वोग्सच्या या अपघातानंतर ह्यूजच्या आठवणी ताजा झाल्या. (वृत्तसंस्था)

Web Title: Vogj injured after falling over the head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.