ऑनलाइन टिम
ब्राझिलिया दि.१६ -अनेक प्रयत्न करूनही होंडुरासला फ्रान्सवर एकही गोल करता आला नाही. तसेच खेळाच्या पहिल्या भागात पहिली ४५ मिनिटे फ्रन्सलाही गोल करता आला नाही. मात्र शर्थीचे प्रयत्न करत करीम बेंझेमाने पहिला गोल केला आणि फ्रेंच फुटबॉल प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. होंडुरासचा मिड प्लेअर अँडी नाजार याने फ्रन्सच्याखेळाडूंकडून चेंडू घेण्याचा प्रयत्न केला असता तो फसला आणि गोल पोस्टपर्यंत बॉल घेऊन जाण्यात तो अयशस्वी ठरला. त्यानंतर ४८ व्या मिनिटाला फ्रान्सच्या वालाडरेसने गोल करत होंडुरासच्या खेळाडूंवर दडपण आणले. खेळाच्या दुस-याभागात ७२ व्या मिनिटाला बेन्झेमाने पुन्हा गोल करत फ्रान्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.