विश्वनाथनला बरोबरीचा ‘आनंद’
By Admin | Updated: December 13, 2015 23:16 IST2015-12-13T23:16:30+5:302015-12-13T23:16:30+5:30
येथे सुरु असलेल्या क्लासिक बुध्दिबळ स्पर्धेत सलग तीन पराभवास सामोरे गेल्यानंतर भारताच्या विश्वनाथन आनंद याने आठव्या फेरीत अमेरीकेच्या फॅबियानो कारुआना विरुध्द बरोबरी साधली.

विश्वनाथनला बरोबरीचा ‘आनंद’
लंडन : येथे सुरु असलेल्या क्लासिक बुध्दिबळ स्पर्धेत सलग तीन पराभवास सामोरे गेल्यानंतर भारताच्या विश्वनाथन आनंद याने आठव्या फेरीत अमेरीकेच्या फॅबियानो कारुआना विरुध्द बरोबरी साधली.
स्पर्धेत विजयी सुरुवात केल्यानंतर आनंदचा खेळ अनपेक्षितपणे खालावला. पहिल्या लढतीतील विजयानंतर त्याला सलग तीन लढती गमवाव्या लागल्या. यावेळी मात्र त्याने सावध खेळ करताना कारुआनाला बरोबरी मान्य करण्यास भाग पाडले. यासह आठव्या फेरीअखेर आनंदचे स्पर्धेत ३ गुण झाले असून हॉलंडच्या अनीश गिरी याने ५ गुणांसह संयुक्तरीत्या आघाडी राखली आहे. अनीशने अमेरिकेच्या हिकारु नकामुराला निर्णायक धक्का देताना फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियर लाग्रवसह स्पर्धेत संयुक्तरीत्या अव्वल स्थानी झेप घेतली.