विश्वनाथन आनंद पुनरागमन करेल

By Admin | Updated: November 10, 2014 23:40 IST2014-11-10T23:40:14+5:302014-11-10T23:40:14+5:30

सुरुवातीच्या चाली निष्फळ ठरल्याने भारताचा सात वेळचा जगज्जेता विश्वनाथन आनंद आता विश्व बुद्धिबळ स्पर्धेत नार्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध तिस:या डावात पुनरागमनासाठी प्रयत्न करणार आहे.

Viswanathan Anand will return | विश्वनाथन आनंद पुनरागमन करेल

विश्वनाथन आनंद पुनरागमन करेल

सोच्ची : सुरुवातीच्या चाली निष्फळ ठरल्याने भारताचा सात वेळचा जगज्जेता विश्वनाथन आनंद आता विश्व बुद्धिबळ स्पर्धेत नार्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध तिस:या डावात पुनरागमनासाठी प्रयत्न करणार आहे. आनंदसाठी दुसरा दिवस निराशाजनक ठरला. शेवटच्या क्षणी काही चुका केल्याने भारताचा हा स्टार खेळाडू पराभूत झाला. आता तो 12 डावांच्या सामन्यात क्.5-1.5 अशा पिछाडीवर आहे. त्याच्या देहबोलीवरून स्पष्ट दिसत होते की बुद्धिबळचा हा बादशाह अजूनही अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. असे असले तरी त्याने पांढ:या मोह:यांनी बरोबरी साधण्यात यश मिळवले होते.
चेन्नईत झालेल्या विश्व चॅम्पियनशीप स्पर्धेप्रमाणोच या वेळी सुद्धा कार्लसनने अपेक्षित सुरुवात केली आहे. आनंदने पहिल्या डावात संघर्षपूर्ण खेळ करीत गुण मिळवले. मात्र, दुस:या डावात अखेरच्या क्षणी त्याला पराभवापासून वंचित राहता आले नाही. दुस:या डावात आनंद थोडा गडबडल्यासारखा दिसला. सामन्यानंतर तो म्हणाला, की मी असा विचार केला नव्हता की, उंट आणि राणीच्या चालीनंतर गडबड होईल. स्थिती चिंताजनक नव्हती; पण माझी स्थिती नाजूक बनली होती. (वृत्तसंस्था) 

 

Web Title: Viswanathan Anand will return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.