सचिनच्या हस्ते ऑलिम्पिक पदक विजेत्यांना BMW भेट

By Admin | Updated: August 28, 2016 14:09 IST2016-08-28T14:09:38+5:302016-08-28T14:09:38+5:30

रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक विजेती कामगिरी करणारी पीव्ही सिंधू आणि साक्षी मलिक यांचे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने रविवारी कौतुक केले.

Visit BMW to Olympic medal winners at the hands of Sachin | सचिनच्या हस्ते ऑलिम्पिक पदक विजेत्यांना BMW भेट

सचिनच्या हस्ते ऑलिम्पिक पदक विजेत्यांना BMW भेट

ऑनलाइन लोकमत 

हैदराबाद, दि. २८ - रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक विजेती कामगिरी करणारी पीव्ही सिंधू आणि साक्षी मलिक यांचे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने रविवारी कौतुक केले. दोघींसाठी एका चांगल्या प्रवासाची आता सुरुवात झाली आहे. भारतीय खेळासाठी हा एक आनंदाचा क्षण आहे असे सचिनने यावेळी सांगितले. 
 
हैदराबादच्या गोपीचंद बॅडमिंटन अॅकेडमीमध्ये पीव्ही सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर आणि पुलेला गोपीचंद यांचा सन्मान करण्यात आला. सचिनच्या हस्ते या चौघांना बीएमडब्ल्यू कार भेट म्हणून देण्यात आली.   
 
प्रवास आता सुरु होतोय. तो इथेच थांबणार नाही असा मला विश्वास आहे. तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व त्या प्रवासात सहभागी होऊ. तुम्ही आम्हाला आनंद साजरा करायच्या अशाच संधी देत रहालं असे सचिनने यावेळी सांगितले. या क्षणाला संपूर्ण देश आनंदी आहे. अनेक चांगल्या गोष्टी घडणार आहेत असे सचिनने सांगितले. 
 

Web Title: Visit BMW to Olympic medal winners at the hands of Sachin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.