वीरू म्हणतो 31 मार्चनंतरही या बँकांत चालतील बंद झालेल्या नोटा
By Admin | Updated: November 14, 2016 18:12 IST2016-11-14T18:12:22+5:302016-11-14T18:12:22+5:30
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर या नोटांची विल्हेवाट कशी लावायची याच्या चिंतेत असलेल्या मंडळींना वीरेंद्र सेहवागने काही बॅंकांचा पत्ता दिला आहे.

वीरू म्हणतो 31 मार्चनंतरही या बँकांत चालतील बंद झालेल्या नोटा
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, 14 - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यानंतर प्रामाणिक लोक आपल्याकडील 500 आणि हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी रांगेत उभे आहेत, तर अवैध पद्धतीने अशा नोटा जमवणारी मंडळी या नोटांची भरपाई कशी कराचयी याची चिंता लागली आहे. अशा लोकांसाठी भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने ट्विटरवरून नोटा जमा करण्यासाठी काही बँकांचा पत्ता दिला आहे.
"काही बँकांमध्ये 31 मार्चनंतरही चलनातून बाद झालेल्या नोटा जमा करण्याची सोय करण्यात आली आहे. या बँकांमध्ये बँक ऑफ गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा आणि गोदावरी यांचा समावेश आहे," असे खणखणीत ट्विट वीरूने केले आहे. ट्विटरवरून कुठल्याही विषयावर मिष्किल टिप्पण्या करण्यात पटाईत असलेला वीरूने याआधीही जरा हट के ट्विट करून धमाल उडवलेली आहे. दरम्यान, नोटबंदीवरून वीरूने केलेल्या ट्विटची जोरदार चर्चा नेटीझन्समध्ये आहे.
After 31stMarch too,5 banks assigned to accept 500/1000.
Banks of Ganga,Yamuna,Saraswati,Narmada,Godavari.#ModifiedForward#DeMonetisation
Banks of Ganga,Yamuna,Saraswati,Narmada,Godavari.#ModifiedForward#DeMonetisation
— Virender Sehwag (@virendersehwag) 13 November 2016