विराटची नव्या विक्रमाला गवसणी

By Admin | Updated: October 22, 2015 19:09 IST2015-10-22T19:04:43+5:302015-10-22T19:09:20+5:30

चेन्नईतील द.आफ्रिकेविरुध्दच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने १३८ धावांची खेळी करत आपल्या क्रिकेट करियरमधील २३वे शतक झळकावले.

Virat's new record | विराटची नव्या विक्रमाला गवसणी

विराटची नव्या विक्रमाला गवसणी

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि.२२ - चेन्नईतील द.आफ्रिकेविरुध्दच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने १३८ धावांची खेळी करत आपल्या क्रिकेट करियरमधील २३वे शतक झळकावले. १२ डावानंतर विराटने आपले २३वे शतक साजरे केले. या शतकाबरोबरच विराट ने भारताचा माजी कर्णधीर सौरव गांगुली, श्रीलंकेचा सलामीविर दिलशान आणि वेस्ट. इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल यांना मागे टाकले. यांची प्रतेकी २२ शतके होती. 

सध्या विराटच्या पुढे चार खेळाडू असून, ते सर्वजन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत झाले आहेत. भारताचा सचिन तेंडूलकर (४९), ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिग(३०), श्रीलंकेचा संगकारा(२५), सनथ जयसुर्या (२८). विराटने २३ शतकाचा पराक्रम १६५ एकदिवसिय सामन्यात केला आहे. 
विराट कोहलीच्या शतकाच्या जवळ सध्या द. आफ्रिकेचे हाशिम आमला आणि एबी डिव्हिलियर्स आहेत, त्यांची प्रतेकी २१ शतके आहेत. 
 

Web Title: Virat's new record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.