चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी विराटचा नवा लूक

By Admin | Updated: May 26, 2017 14:45 IST2017-05-26T14:45:06+5:302017-05-26T14:45:06+5:30

विराटने लंडनमध्ये दाखल होताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला फोटो शेअर केला आहे

Virat's new look for Champions Trophy | चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी विराटचा नवा लूक

चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी विराटचा नवा लूक

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - भारतीय क्रिकेट संघ चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी सज्ज झाला असून इंग्लंडला रवाना झाला आहे. एक जूनपासून आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीला सुरुवात होत आहे. पण त्याआधी भारतीय कर्णधार विराट कोहलीने चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी आपला नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. विराट कोहली नव्या लूकसह इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. 4 जून रोजी डिफेंडिंग चॅम्पिअन भारतीय संघ आपला पहिला सामना खेळणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत असणार असल्याने उत्सुकता शिगेला आहे. 
 
विराटने लंडनमध्ये दाखल होताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये विराटचा लूक बदलणारा सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट आलिम हाकिमही दिसत आहे. आलिम हाकिमनेही आपल्या इन्स्टाग्रामवर विराट कोहलीच्या हेअरस्टाईलचे फोटो शेअर केले आहेत. ‘भारताचा अभिमान’ या शब्दात आलिमने विराटवर स्तुतीसुमनं उधळत कौतुक केलं आहे.

Thank you @aalimhakim for keeping my hair game strong! ✌️

Web Title: Virat's new look for Champions Trophy